---Advertisement---

टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…”

On: गुरूवार, जानेवारी 5, 2023 5:50 PM
---Advertisement---

पुणे येथे होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्याआधी प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने विदर्भाच्या जितेश शर्मा याचा संघात समावेश केला गेला आहे. काही दिवसांपूर्वी संघाच्या आसपासही नसलेल्या जितेश याला थेट भारतीय संघात सामील केले गेल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे. नुकतेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपण कोणत्या भारतीय खेळाडूंचा चाहता आहे हे स्पष्ट केले.

भारतीय संघात समावेश झाल्यानंतर जितेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत एमएस धोनी व रोहित शर्मा यांच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. जितेश म्हणाला,

“एमएस धोनी याला मी माझा आयडल मानतो. त्याच्याकडून मला भरपूर शिकायला मिळाले. दुसरीकडे रोहित शर्माचा मी मोठा चाहता आहे. मी मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना त्याने मला माझा खेळ सुधारण्यात मोठी मदत केलेली.”

संजू सॅमसन याला पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, सूज आल्याने तो भारतीय संघासह पुणे येथे पोहोचला नाही. मुंबईत राहूनच तो या दुखापतीवर उपचार घेईल. त्याचा बदली खेळाडू म्हणून जितेश शर्मा याला संघात सहभागी केले गेले.

जितेश हा विदर्भ संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळताना त्याला ओळख मिळाली. त्याने पंजाबसाठी फिनिशरची भूमिका योग्यरित्या पार पाडत संघाच्या विजयात योगदान दिले. आपला पहिला संगम खेळत असलेल्या जितेशने 12 सामने खेळताना 163.6 च्या धमाकेदार स्ट्राइक रेटने 264 धावा फटकावल्या. यापूर्वी देखील तो 2016 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

(MS Dhoni My Idol And Am Big Fan Of Rohit Jitesh Sharma Said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत मारिन चिलीचचा उपांत्यपुर्व फेरीत दिमाखात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---