कॅप्टनकूल एमएस धोनी जसा त्याच्या यष्टीरक्षणासाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जोतो तसाच तो त्याच्या केसांच्या वेगवेगळ्या स्टाईलमुळेही प्रसिद्ध आहे.
नुकतीच त्याने नवीन हेअरस्टाईल केली आहे. त्याचे फोटो मुंबईमधील एका हेअर सलूनच्या इंस्टाग्राम अकाउंंटवर पोस्ट करण्यात आले आहे. यात धोनीने मोहावक हेअरस्टाईल केल्याचे दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये धोनीची मैत्रीण तसेच हेअरस्टायलीश सपना भावनानीनेच त्याचा हा हेअरकट केल्याची माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/Blw5NvIFe25/?taken-by=madowothair
तसेच सपना भावननीनेही दोन दिवसापूर्वी धोनीचा हेअरकट करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.
Have been learning how to use an Ustra from a super talented local barber named Fazil. Today I got to use my learning on my mentor @msdhoni It’s an amazing #gurupurnima indeed. #jebaat #dhoni @madOwothair pic.twitter.com/UTFE6k1wol
— ???????????????????????? ???????? ???????????????? (@sapnabhavnani) July 26, 2018
धोनी नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन भारतात परतला आहे. या दौऱ्यातील त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याला टीकेला सामोेरे जावे लागले होते. या दौऱ्यात त्याला तीन पैकी एका टी20 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. ज्यात त्याने नाबाद 32 धावा केल्या. तर वनडे मालिकेत तीन पैकी दोन सामन्यात मिळून त्याने 79 धावा केल्या.
भारतीय संघ 1 आॅगस्टपासून इंग्लड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आता त्याला जवळ जवळ दोन-अडीच महिन्याची विश्रांती मिळाली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–सौरव गांगुलीने दिल्या इम्रान खानला शुभेच्छा!






