इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. तीनवेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघही दुबईमध्ये जोरदार सराव करत आहे. या संघाचा कर्णधार असणाऱ्या एमएस धोनीची लोकप्रियचा केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. असाच काहीसा प्रकार दुबईतही दिसला आहे. धोनीची एक झलक पाहाण्यासाठी चाहत मैदानाबाहेर आले होते. धोनीनेही हात हलवत त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.
सध्या खेळाडू बायोबबलमध्ये असल्याने त्यांना बाहेरच्या लोकांशी संपर्क साधण्याची परवानगी नाही. त्यामुळे चाहतेही आपल्या आवडत्या खेळाडूंना जवळून भेटू शकत नाही. असे असले तरी चाहत्यांमध्ये असलेले क्रिकेटप्रेम कमी झालेले नाही. याचाच प्रत्यय चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओतून नुकताच आला आहे.
चेन्नईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी आणि अन्य खेळाडू ट्रेनिंग संपवून बसकडे परत जात आहे. यावेळी बाहेर दूर उभे राहिलेले चाहते धोनीला आवज देत आहेत. यात काही लहान मुलेही दिसत आहेत. ते पाहून धोनीनेही हात हलवत त्यांचे अभिवादन स्विकारले. धोनी आणि खेळाडूंनी यावेळी मास्क घातलेलाही दिसत आहे.
Your 💛, Everywhere we go🎶🔊#UrsAnbudenEverywhere #WhistlePodu #Yellove 🦁 @msdhoni pic.twitter.com/8erSH5Pnnb
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 11, 2021
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी खेळणार आहे. या टप्प्यातही धोनीच चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल. पहिल्या टप्प्यात धोनीची शांत राहिलेली बॅट, दुसऱ्या टप्प्यात तळपण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये आत्तापर्यंत ७ सामन्यांत केवळ ३७ धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्स संघ जबरदस्त फॉर्ममध्ये
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतात सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या हंगामाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कामगिरीनंतर गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ ७ सामन्यांमधील ५ सामन्यांत विजय मिळवून १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या यादीत १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ पहिल्या टप्प्यातील उत्कृष्ट फॉर्मच दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या टप्प्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने १९ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कुणीतरी येणार गं! सीएसकेचा ‘हा’ खेळाडू लवकरच होणार ‘बापमाणूस’, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
अश्विनची निवड न होणे ते जार्वोची घुसखोरी, भारताच्या इंग्लंड दौऱ्यात चर्चेत राहिले ‘हे’ ४ मुद्दे
श्रीलंकेविरुद्ध ६९ धावांची खेळी केल्यानंतर दीपक चाहरला धोनीने केला होता ‘हा’ मेसेज