भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागीलवर्षी निवृत्त झाला आहे. त्याने २०१४ सालामध्येच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर मागीलवर्षी १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती जाहीर केली होती. यामुळेच आता चाहत्यांना फक्त आयपीएल स्पर्धेतच धोनीला खेळताना पहायची संधी मिळणार आहे. दरम्यान, धोनीने रांचीमधील आपल्या आवडत्या स्थानी जाऊन भेट दिली आहे, त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु व्हायला काही महिनेच उरले आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीने रांचीमध्ये असलेल्या देवडी माता मंदिराला भेट दिली आहे. धोनी जेव्हाही रांचीमध्ये असतो. तेव्हा तो या मंदिराला नक्की भेट देतो. यावेळीही आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याने शुक्रवारी ( २६ फेब्रुवारी) या मंदिरात पूजा केली. या पूजेतील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Latest pics of MS Dhoni 🦁👌
Getting fitter and looking better ❤️ #MSDhoni | @msdhoni | #WhistlePodu pic.twitter.com/SO6qRMuGCN
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) February 27, 2021
पोलिसांचा कडक पहारा
एमएस धोनी या मंदिरात पूजा करण्यासाठी येणार, या गोष्टीची कल्पना मंदिर प्रशासनाला आधीच देण्यात आली होती. तसेच धोनी आल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना मिळताच त्यांनी धोनीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी देखील काढले. याबरोबरच मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काटेकोर बंदोबस्त केला होता. प्रसिद्ध देवडी मंदिर हे टाटा-रांची मार्गावर आहे. तसेच मंदिरातील मुख्य पुजारी मनोज पांडा आणि पुजारी नरसिंह पांडा यांच्याहस्ते ही पूजा संपन्न झाली. २५ मिनिटे चाललेल्या या पूजेत प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला.
Some more pics of our idol MS Dhoni from his Deori Temple visit 🙏 @msdhoni | #MSDhoni | #WhistlePodu pic.twitter.com/4RZCNbeRP5
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) February 27, 2021
https://twitter.com/DhoniItCell/status/1365608215451291650
आयपीएल १४ व्या हंगामात धोनीकडून असतील मोठ्या अपेक्षा
भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीने खूप वेळ रांची येथे असलेल्या फार्म हाउसमध्ये घालवला आहे. मागच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. तसेच धोनीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
T20 Series: कोहलीसाठी डोकेदुखी; विजय हजारे ट्रॉफीत ‘यांचे’ धडाकेबाज प्रदर्शन, कुणाची करावी निवड?