भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याला जगभरातील अनेक क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. त्याची मैदानातील कामगिरी सर्वांनाच परिचित आहे. परंतु तो मैदानाबाहेर देखील तितकाच शांत आहे. यासोबतच तो दिलदारदेखील आहे. याचे उदाहरण तो नेहमीच आपल्या कृत्त्यातून देत असतो. धोनी किती दिलदार आहे याचे प्रत्यय देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धोनीचा चाहता वर्ग भरपूर आहे. अनेकदा असेही घडले आहे, जेव्हा लाईव्ह सामन्यात चाहत्यांनी मैदानात येऊन त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी धोनीने कुठलाही संताप व्यक्त न करता त्यांची भेट घेतल्याचे किस्से आहेत. आता सध्या एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी स्वतः चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या स्टाफ मेंबरला सलाम करताना दिसून येत आहे.
या फोटोमध्ये धोनी चेन्नईची जर्सी परिधान करून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना दिसत आहे. तो जात असताना सुरुवातीला समोर पायरीवर उभा असलेल्या स्टाफ मेंबरने धोनीला सलाम केला होता. हे पाहून धोनीने देखील त्याला सलाम केल्याचे पाहायला मिळाले. यावरून धोनी किती मोठ्या मनाचा माणूस आहे आणि लोकांचा किती आदर्श हे दिसून येते.
Pic of last night ❤️#CSK staff member saluting Team Captain as well as Lieutenant Colonel and Maahi bhai also Salute back them!
Now some barking dogs telling #MSDhoni using just mobile not saluting back.
How much hate and negativity you have
Dogs🤦🏻♀️ 🥴 pic.twitter.com/8DCnK3q0yO— Sagar Kamble🇮🇳 (@IamSKtashan) April 20, 2021
Your character speaks louder than your words…..Best picture you all would see in internet today#MSDhoni #CSKvRR #Thala #Dhoni #IPL2021 #mahi pic.twitter.com/TWjSfeBY9Z
— Lellapati Manikanta Reddy (@manilellapati) April 20, 2021
🙇♂🔥 @MSDhoni pic.twitter.com/saMNI4A3JB
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) April 20, 2021
हा व्हायरल होत असलेला फोटो, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्याचा आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४५ धावांनी विजय मिळवला होता. तसेच धोनीने या सामन्यात १७ चेंडूत १८ धावांची खेळी केली होती. यात त्याने २ चौकार लगावले होते.
आज चेन्नई सुपर किंग्ज संघाची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात एमएस धोनीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा कोहली धोनीचे ग्लोव्हज घालून करतो त्याचीच नक्कल, Video पाहून जुन्या आठवणी होतील ताज्या
रिषभ पंतचं हृदय चोरणारी सौंदर्यवती आहे तरी कोण? जिच्या एका फोटोचेही आहेत लाखो दिवाने