रविवारी (०३ एप्रिल) मुंंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२२चा अकरावा सामना खेळला गेला. हा सामना जिंकत चेन्नईकडे हंगामातील पहिला विजय नोंदवण्याची संधी होती. तर पंजाबच्या संघाच्या पदरी दुसरा विजय पडणार होता. त्यामुळे उभय संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसला. दरम्यान या सामन्यासाठी मैदानावर पाऊल ठेवताच चेन्नईचा स्टार क्रिकेटपटू एमएस धोनी याने मोठा विक्रम आपल्या खात्यात नोंदवला आहे.
पंजाबविरुद्धचा हा सामना धोनीच्या ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्दीतील ३५० वा सामना होता. यासह तो भारताकडून सर्वाधिक ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा याने भारताकडून सर्वाधिक ३७२ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले आहेत. तर धोनीचा माजी संघसहकारी आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३३६ सामने खेळले आहेत. याखेरीज दिनेश कार्तिक आणि विराट कोहली देखील ३२० पेक्षा जास्त सामने खेळत पहिल्या ५ जणांमध्ये आहेत.
भारताकडून सर्वाधिक ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळणारे खेळाडू-
३७२ सामने – रोहित शर्मा
३५० सामने – एमएस धोनी*
३३६ सामने – सुरेश रैना
३२९ सामने – दिनेश कार्तिक
३२८ सामने- विराट कोहली
एमएस धोनीची ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्द
धोनीच्या या ३५० ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये २२३ आयपीएल सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश आहे. पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळताना धोनीने २२३ सामन्यांमध्ये ४०.१० च्या सरासरीने ४८१२ धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २४ अर्धशतके निघाली आहेत. याखेरीद ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना त्याने ३७.४० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकेही केली आहेत.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जची (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी
महत्त्वाच्या बातम्या-
टॉम लॅथमने वाढदिवस बनवला आणखी खास, तब्बल २४ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम काढला मोडीत
थाला @३५०! धोनीचा टी२०त ‘भीमपराक्रम’, मैदानावर पाऊल ठेवताच शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
चहलच्या दबावामुळे बटलरने मुंबईविरुद्ध ठोकले शतक, जाणून घ्या जोसने असे म्हणण्यामागचे कारण