बुधवारी (12 एप्रिल) एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज हंगामातील चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा या सामन्यासाठी धोनीने मैदानात पाय टाकताच मोठा विक्रम त्याच्या नावावर झाला. कर्णधार म्हणून धोनीचा सीएसकेसाठी हा 200वा सामना ठरला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.
आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत एमएस धोनी (MS Dhoni ) पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या संघासाठी 200 सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा धोनी एकमेव आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 146 सामने खेळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे, ज्याने 140 सामन्यांमध्ये आरीसीबीचे नेतृत्व केले. भारतीय संघाचा माजी दिग्गज गौतम गंभीर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यामध्ये नेतृत्व करणारा चौथा कर्णधार आहे. गंभीरने 108 सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले.
67 सामन्यांसह डेविड वॉर्नर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराच्या रूपात वॉर्नरने ही कामगिरी केली. यादीत सहाव्या क्रमांकावर दिवंगत शेन वॉर्न याचे नाव आहे. वॉर्नने राजस्थान रॉयल्ससाठी 55 सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका बजावली. 52 सामन्यांसह विरेंद्र सेहवाग आणि 51 सामन्यांसह सचिन तेंडुलकर अनुक्रमे सात आणि आठव्या क्रमांकावर आहेत.
कर्णधार म्हणून एका संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
200* – एमएस धोनी, चेन्नई सुपर किंग्ज
146 – रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स
140 – विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
108 – गौतम गंभीर, कोलकाता नाईट रायडर्स
67 – डेविड वॉर्नर, सनरायझर्स हैदराबाद
55 – शेन वॉर्न, राजस्थान रॉयल्स
52 – विरेंद्र सेहवाग, दिल्ली डेअरडेवल्स/कॅपिटल्स
51 – सचिन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स
कर्णधार म्हणून धोनीची कामगिरी –
दरम्यान, धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर एक जनर टाकली, तर त्याच्या नेतृत्वात सीएसकेने आतापर्यंत खेळलेल्या 199 सामन्यांपैकी 120 सामने त्याने जिंकले आहेत. 78 सामन्यात सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला, तकर एक सामना निकाली निघाला नाही. धोनीने कर्णधार म्हणून आपल्या पहिला, 50वा, 100वा सामना जिंकला होता. 150व्या सामन्यात मात्र सीएसकेला पराभवाचे तोंड पाहावे लागले. पण बुधवारी 200व्या सामन्यात धोनी पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देऊ शकतो. आपले होम ग्राउंडवर चेपॉक स्टेडियमवर सीएसके हा सामना खेळणार असल्याने त्यांच्या विजयाच्या आशा अधिकच आहेत.
दरम्यान, 2008 साली आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंत धोनीच सीएसकेचा नियमित कर्णधार आहे. मागच्या हंगामात रविंद्र जडेजाला सीएसकेचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. पण संघाच्या सुमार प्रदर्शनानंतर जडेजा कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि धोनीला पुन्हा ही जबाबदारी स्वीकारावी लागली. तसेच सुरेश रैना देखील काही सामन्यांमध्ये सीएसकेचा कर्णधार राहिला आहे. रैनाने 6 सामन्यांमध्ये, तर जडेजाने 8 सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्व केले आहे. (MS Dhoni played Most matches as captain for a team in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“चार सामने खेळण्याचा फिटनेस नाही आणि 14 कोटी घेतो”, चहरवर संतापले शास्त्री
आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर, खराब फॉर्मातील सूर्यकुमार ‘या’ स्थानावर