चेन्नई सुपर किंग्स संघाकडे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणून पाहिले जाते. चेन्नईने चार वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. त्यांनी २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ साली किताबावर आपले नाव कोरले होते. चेन्नईने ही कामगिरी एमएस धोनीच्या नेतृत्वात केली होती. मात्र, धोनीने आयपीएल २०२२मध्ये कर्णधारपद सोडले. त्यानंतर चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर आली. चेन्नईने यंदाच्या हंगामात सहा सामन्यांपैकी ५ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, यादरम्यान अनेकदा धोनी कर्णधाराप्रमाणे सूचना देताना दिसला. अशात मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले.
गुरुवारी (दि. २१ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात आयपीएलचा ३३वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने यावेळी फलंदाजी करताना पहिल्याच षटकात आपले दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनची विकेट गमावली. यानंतर फलंदाजीला येणारे पुढील फलंदाजही नियमित अंतराने तंबूत परतले. मुंबई संघाने १३.३ षटकात ८५ धावांवर असताना ५ विकेट्स गमावले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी कायरन पोलार्ड आला. पोलार्ड यादरम्यान जोरदार फटकेबाजी करताना दिसला. त्याने ९ चेंडूत १४ धावा चोपल्या. यामध्ये १ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान पोलार्ड चांगली फटकेबाजी करताना एमएस धोनी क्षेत्ररक्षण लावताना दिसला. विशेष म्हणजे, धोनीने क्षेत्ररक्षण लावल्यानंतर पोलार्डने सरळ दिशेने मारलेला चेंडू शिवम दुबेच्या हातात गेला. खास बाब अशी की, धोनीने असेच काहीसे २०१०मध्येही केले होते. तेव्हाही धोनीने असे क्षेत्ररक्षण लावत पोलार्डला तंबूत धाडले होते. यादरम्यान धोनी सर्व सूचना देत होता. दुसरीकडे, जडेजा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी धोनी कर्णधार नसूनही कर्णधाराप्रमाणे निर्णय घेताना दिसला.
यादरम्यानचे काही फोटो व्हायरल होतायत. त्यात चाहते म्हणतायत की, “मास्टर ब्रेन एमएस धोनी! तो कर्णधार नाहीये, पण तो लिडर आहे.”
Master brain MS Dhoni !! He is not captain now still he is leader #MSDhoni #Dhoni
Now 2010 final pic.twitter.com/14O8E9ABYM
— Shiva𝐌𝐬𝐝ian™ (@ShivaDhonifan7) April 21, 2022
Dube didn't move even a bit. The fied placement was so perfect from MS Dhoni against pollard. pic.twitter.com/Rb15XiZyoE
— Div🦁 (@div_yumm) April 21, 2022
काही चाहत्यांनी धोनीच्या बुद्धीचेही कौतुक केले. चाहते ट्वीट करत धोनीचे कौतुक करतायत.
Field replacement of Pollard before the wkt by Master mind MS Dhoni 🥵 pic.twitter.com/5hhPOnoBvV
— . (@MSDhoniwarriors) April 21, 2022
Field set by MS Dhoni, next ball Kieron Pollard out. pic.twitter.com/qmg00JFwMM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2022
चेन्नई सुपर किंग्स संघ या हंगामातील पुढील सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई-चेन्नई सामन्यात उथप्पा आणि जडेजासह ‘हे’ ४ धुरंधर करू शकतात नादखुळा विक्रम
मुंबई इंडियन्सच्या सगल ६ पराभवांना ‘हा’ खेळाडू जबाबदार; माजी दिग्गजाने साधला निशाणा