भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो नेहमी चर्चेत असतो. धोनी त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी अजूनही नेतृत्व करतो. सध्या तो वेगवेगळ्या जाहिरातींच्या शुटमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका जाहिरातीच्या शुटदरम्यान धोनी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची भेठ झाली. या दोन दिग्गजांनी एकत्र काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी अलिकडच्या काळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंकज यांनी सुप्रसिद्ध बेव सिरीज ‘मिंरझापूर’ मध्ये ‘कालीन भैय्या’ हे महत्वाचे पात्र साकारले होते, त्याच्या भूमिकेला चाहत्यांकडून प्रचंड लोकप्रियता आणि प्रेम मिळाले. यानंतर त्यांच्या कारकिर्दीताल खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्याव्यतिरिक्त पंकज यांनी इतरही अनेक चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडल्या आहे. ते त्यांच्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखले जातात.
https://www.instagram.com/p/CXTpddpBmXU/
एमएस धोनीचा पंकज त्रिपाठींसोबतचा हा फोटो त्याचा बालपणीचा मित्र सीमांत लोहानीने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये धोनीही नव्या आणि वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. लोहानी हा धोनीचा वयाच्या चार वर्षांपासूनचा चांगला मित्र आहे. धोनीच्या आयुष्यावर बनवलेला चित्रपट ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ यामध्ये देखील लोहानीची महत्वाची भूमिका दाखवली गेली आहे.
https://www.instagram.com/p/CXQ_4fhhPNp/
धोनीचा हा फोटो व्हायरल होण्यापूर्वी त्याच्या दुसरा एक फोटो देखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. या फोटोत धोनी आणि भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैली युवराज सिंग दिसत होता. या दोघांचा हा फोटो एका जाहिरातीच्या शुटदरम्यानचा असल्याचे सांगितले गेले होते. चाहत्यांना देखील धोनी आणि युवराजला बऱ्याच दिवसांनी एकत्र पाहून आनंद झाला होता. फोटोत दोन्ही दिग्गज सोफ्यावर बसून चर्चा करताना आणि हसताना पाहिले गेले होते.
Meet up of Dhoni & Yuvraj after a Long time…😍❤️ pic.twitter.com/E1ByExs447
— CricketWithLove 😍🏏 (@cricket_widlove) December 6, 2021
तत्पूर्वी, धोनीला शेवटच्या वेळी मैदानावर खेळताना २०२१ च्या आयपीएल हंगामात पाहिले गेले होते. या हंगामात धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना संघाला चौथे विजेतेपद जिंकवून दिले. धोनी आयपीएलच्या आगामी २०२२ हंगामात देखील त्याच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला १२ करोड रुपयांमध्ये आगामी हंगामासाठी रिटेन केले आहे, तर दुसरीकडे रवींद्र जडेजाला चेन्नई संघाने एमएस धोनीपेक्षा जास्त १६ करोड रुपये देऊन रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
युझवेंद्र चहलच्या पत्नीने केली धोनीच्या ‘हेलीकॉप्टर’ शॉटची नक्कल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
शहीद रावत यांनी दिले होते धोनीला आर्मीचे ट्रेनिंग; कौतुक करत म्हणालेले…
गॅबा कसोटीचे अचानक बंद झाले जगभरातील लाईव्ह टेलिकास्ट, डीआरएस ठप्प; वाचा सविस्तर