मागील अनेक दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेटपासून दूर होता. परंतु तो गुरुवारी झारखंडच्या (Jharkhand) रणजी संघाच्या खेळाडूंबरोबर सराव करताना दिसला आहे.
गुरुवारी धोनीला मैदानात पाहून सर्व आश्चर्यचकीत झाले होते. तसेच 38 वर्षीय धोनी सराव सत्रात सहभागी होतोय हे पाहून झारखंड संघ व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटले. धोनीच्या आगमनाची झारखंड व्यवस्थापनालाही कल्पना नव्हती.
“तो आमच्याबरोबर येईल आणि सरावात भाग घेईल याची आम्हाला माहिती नव्हती. ते आमच्यासाठी एक आश्चर्य होते. त्याने थोडा वेळ फलंदाजी केली आणि नेहमीप्रमाणे सराव केला,” असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत झारखंड संघ व्यवस्थापनाच्या (Jharkhand Team Management) एका सुत्राने सांगितले.
“धोनीने आतापासून संघाबरोबर नियमितपणे सराव करेल असे आम्हाला अपेक्षित आहे. त्याची उपस्थिती खेळाडूंना मदत करू शकते,” असेही सुत्राने सांगितले.
सरावादरम्यान धोनीने त्याच्या नव्या बॉलिंग मशीनचा वापर करत पांढऱ्या चेंडूने सराव केला. तर उर्वरित खेळाडूंनी नियमितपणे आपल्या लाल चेंडूने सराव केला.
धोनीने आतापर्यंत 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे 4876 कसोटी धावा, 10773 वनडे धावा आणि 1617 टी20 धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफीतील झारखंडचा पुढील सामना उत्तराखंडविरुद्ध रविवारी रांची येथे पार पडेल.
https://twitter.com/Maha_Sports/status/1218104821867139072
https://twitter.com/Maha_Sports/status/1218101298093948929