शनिवार रोजी (२६ मार्च) ‘क्रिकेट का त्योहार’ अर्थात इंडियन प्रीमियर लीग २०२२ची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा पहिला सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. तत्पूर्वी चेन्नई संघाचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी याने आश्चर्यजनक निर्णय घेत कर्णधारपद सोडले आहे आणि रविंद्र जडेजाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. असे असले तरीही, ‘थाला‘च्या चाहत्यांसाठी अजूनही धोनीच चेन्नईचा कर्णधार आहे. याचा प्रत्यय नुकताच एका व्हिडिओतून आला आहे.
धोनीचा (MS Dhoni) चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेकांसाठी तो आताही चेन्नई संघाचा कर्णधार (Chennai Super Kings Captain) आहे. म्हणूनच त्याच्या एका चाहत्याने (MS Dhoni Fan) त्याला मोठ्याने ओरडत तू अजूनही माझा कर्णधार आहेस, असे म्हटले आहे. त्या चाहत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, धोनी त्याच्या संघातील इतर खेळाडूंसोबत हॉटेलमध्ये जात आहे. हॉटेलच्या पायऱ्यांवर चढताना चाहता मोठ्याने ओरडत धोनीला म्हणतो की, ‘थाला तू नेहमीच माझा कर्णधार राहशील.‘ यावर धोनी चाहत्याकडे बघतो आणि हात वरती करत प्रेमळ अशी प्रतिक्रिया देतो.
https://www.instagram.com/reel/Cbjcx0BAwzc/?utm_source=ig_web_copy_link
चेन्नईने अशी दिली होती धोनीच्या कर्णधारपद सोडण्याची माहिती
तत्पूर्वी धोनीने चेन्नईचे नेतृत्त्वपद सोडल्याची माहिती देताना सीएसकेने म्हटले आहे की, “धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्त्वपद दुसऱ्या खेळाडूकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने संघाची कमान सांभाळण्यासाठी जडेजासाठी निवड केली आहे. २०१२ पासून जडेजा चेन्नईचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. तो चेन्नईचे नेतृत्त्व करणारा केवळ तिसराच खेळाडू बनेल.”
चेन्नई आणि कोलकाताची आमने सामने कामगिरी
दरम्यान चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) संघातील आकडेवारी पाहता, चेन्नईचे पारडे कोलकातापेक्षा जड (CSK And KKR Head To Head Records) आहे. आतापर्यंत चेन्नई आणि कोलकाता संघ आयपीएलमध्ये २५ वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. यापैकी १७ सामने चेन्नईने तर ८ सामने कोलकाताने जिंकले आहेत. अर्थात चेन्नईने कोलकातापेक्षा दुप्पटीने जास्त सामने जिंकले आहेत.
मागील हंगामातील उभय संघांच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ मध्ये ३ सामने खेळले गेले होते. त्यातील तिन्हीही सामने चेन्नईने जिंकले होते. यामध्ये अंतिम सामन्याचाही समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Photo: आयपीएल २०२२ आधी चेन्नईचा जुना शिलेदार डू प्लेसिसची धोनीशी गळाभेट, ‘माहीराट’चीही ग्रेटभेट
जडेजा का बनला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, ‘ही’ आहेत ५ महत्त्वाची कारणे