गुरुवार रोजी (२४ मार्च) इंडियन प्रीमियर लीगमधून मोठी बातमी पुढे आली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रँचायझीचा कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार केला आहे. २०२१ नंतर हा पहिलाच आयपीएल हंगाम असेल, ज्यामध्ये सीएसकेचा संघ धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणार नाही. परंतु अनेकांना हे माहिती नाही की, एकदा सुरेश रैना याच्या नेतृत्त्वाखाली धोनी निव्वळ खेळाडू म्हणून सीएसकेकडून खेळला होता. त्या सामन्यात धोनीने यष्टीरक्षणही केले नव्हते.
हा किस्सा २०१२ मध्ये घडला होता तेव्हा चँपियन्स लीगमध्ये (Champions League) धोनी (MS Dhoni) रैनाच्या नेतृत्त्वाखाली (Dhoni Played Under Raina’s Captaincy) खेळला होता. या स्पर्धेत जगभरातील वेगवेगळ्या टी२० लीगमधील विजेते संघ सामने खेळत असायचे. यातील २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या चँपियन्स लीगमध्ये सीएसकेचा संघ अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. त्यामुळे यॉर्कशरविरुद्धच्या एका सामन्यात धोनीने सीएसकेचे नेतृत्त्व न करण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात त्याने यष्टीरक्षणही न करायचे ठरवले होते. त्यामुळे रैनाला त्या सामन्यासाठी सीएसकेचा प्रभारी कर्णधार बनवले गेले होते आणि वृद्धिमान साहा यष्टीरक्षक म्हणून यष्टीमागे उभा राहिला होता. हा पहिला आणि एकमेव सामना होता, ज्यामध्ये धोनी दुसऱ्या कोणत्या खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेकडून खेळला (Dhoni’s One & Only Match As Player From CSK) होता.
सीएसकेने हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला होता. या सामन्यात यॉर्कशरने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने सुब्रमण्यम बद्रीनाथ (४७ धावा) आणि धोनी व रैना यांच्या प्रत्येकी ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच यॉर्कशरचे लक्ष्य पूर्ण केले होते आणि सामना खिशात घातला होता.
धोनीने नेतृत्त्वपद सोडल्यानंतर काय म्हणाली सीएसके?
तत्पूर्वी धोनीने सीएसकेचे नेतृत्त्वपद सोडल्याची माहिती देताना सीएसकेने म्हटले आहे की, “धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्त्वपद दुसऱ्या खेळाडूकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने संघाची कमान सांभाळण्यासाठी जडेजासाठी निवड केली आहे. २०१२ पासून जडेजा सीएसकेचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. तो सीएसकेचे नेतृत्त्व करणारा केवळ तिसराच खेळाडू बनेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा