भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, याला भेटण्याची इच्छा जवळपास प्रत्येक भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याला असते. मात्र, प्रत्यक्षात ही इच्छ खूपच कमी जणांची पूर्ण होत असते. शुक्रवारी (7 जुलै) धोनीने आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घरासमोर गर्दी केली होती. ताज्या माहितीनुसार धोनी या चाहत्यांना भेटला, पण काहीशा अंतरावरूनच.
एमएस धोनी (MS Dhoni) आपल्या 42व्या वाढदिवशी रांचीतील आपल्या घरी असल्याचे पाहायला मिळाले. घराबाहेर जमलेल्या चाहत्यांचे अभिवादन धोनीन स्वीकार केले. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत चाहते दुरूनच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. काहीजण आपला आवाज त्याच्यावर्यंत पोहोचावा यासाठी मोठ्याने ओरडत देखील आहेत. समोरून धोनी मात्र घराच्या छतावरून चाहत्यांकडे पाहून हात हालवत आहे.
एमएस धोनीची क्रिकेट कारकीर्द नेहमीच युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी राहिली आहे. एक रेल्वे टीसी, तेर भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार असा त्याचा प्रवास राहिला आहे. धोनीने भारताला 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषक, 2011 साली आयसीसी वनडे विश्वचषक आणि 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली. 2004 साली धोनीने भारतीय संघासाठी एक हिटर म्हणून पदार्पण केले, पण पुढे तो संघाचा सर्वोत्तम फिनिशर बनला. आजही धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी फिनिशरची भूमिका पार पाडतो.
VIDEO OF THE DAY📍
Thala Dhoni waves back to the Fans waiting outside his Residence !! ❤️👋#HappyBirthdayDhoni | #MSDhoni | #Dhoni pic.twitter.com/mvUO3otMY2
— Saravanan Hari 💛🦁🏏 (@CricSuperFan) July 7, 2023
2020 साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण इंडियन प्रीमियर लीगमधून अद्याप तो निवृत्त झाला नाहीये. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने यावर्षी पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयपीएळ 2023 नंतर धोनी निवृत्त होणार, अशा चर्चा होत्या. पण आगामी आयपीएल हंगामातही तो खेळणार, असे सध्या सांगितले जात आहे. (MS Dhoni received the fans’ wishes from his home in Ranchi Watch video)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । बेअरस्टोसोबत भांडण! 100व्या कसोटीत फेल ढरलेल्या स्टीव स्मिथचा राग अनावर
‘बिचारा कुलदीप’, बागेश्वर बाबासोबत फिरकीपटूचा फोटो व्हायरल होताच चाहत्याची लक्षवेधी कमेंट