इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून एमएस धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून पुनरागमन केले.
धोनीने (MS Dhoni) या आयपीएल हंगामाला (IPL 2022) सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नईचे कर्णधारपद (CSK Captain) सोडले होते. त्याच्याऐवजी ही जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवण्यात आली होती. पण रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला खास काही कामगिरी करता आली नाही. चेन्नईने त्याच्या नेतृत्वाखाली ८ पैकी ६ सामन्यात पराभव पत्करला आणि २ सामन्यात विजय मिळवला. तसेच यादरम्यान जडेजाने वैयक्तिक कामगिरी देखील फारशी चांगली झाली नाही. त्यामुळे जडेजाने वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा चेन्नईचे कर्णधारपद एमएस धोनीच्या खांद्यावर आले.
त्यामुळे जेव्हा रविवारी धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून नाणेफेकी वेळी मैदानात आला, तेव्हा स्टेडियममध्ये चाहत्यांनी मोठा गजर केला होता. यावेळी चाहत्यांच्या आवाजामुळेच समालोचक डॅनी मॉरिसन यांनाही धोनीला प्रश्न विचारण्यापूर्वी काहीवेळ आवाज शांत होण्याची वाट पाहावी लागली.
त्यानंतर मॉरिसन यांनी धोनीला त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला. त्यानंतर धोनीने उत्तर दिले की, ‘तुम्ही मला पिवळ्या जर्सीच नक्कीच पुढच्या वर्षी पाहाल, मग ती ही असेल किंवा दुसरी असेल. तुम्हाला हे माहित नसते, हाच फरक आहे.’
MS Dhoni Is An Emotion! 💛
Thala is back to lead @ChennaiIPL once again!
Follow the match 👉 https://t.co/8IteJVPMqJ#TATAIPL | #SRHvCSK pic.twitter.com/XV9OAd1OB2
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
दरम्यान, धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपद हाती घेताच चेन्नईने हंगामातील तिसरा विजय नोंदवला आहे. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २०२ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ऋतुराजव्यतिरिक्त डेवॉन कॉनवेने ८५ धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजनने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत ६ बाद १८९ धावाच करता आल्या. हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तसेच केन विलियम्सनने ४७ धावांची खेळी केली. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ क्रिकेटरमध्ये टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवण्याची आहे संधी, स्टेनने दाखवलाय विश्वास
केवळ ऋतुराजच नाही, तर यापूर्वी हे चार खेळाडूही आयपीएलमध्ये झालेत ९९ धावांवर बाद