भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने इच्छा असेल तर पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परतावे असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
तसेच धोनी कसोटीतून खूपच लवकर निवृत्त झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
“जर एमएस धोनीला त्याची कसोटी कारकीर्द पुन्हा सुरु करावी असे वाटत असेल तर त्याने कसोटीत परतायला हवे. त्याला कर्णधारपदाचे खूप मोठे ओझे होते. त्याने कर्णधारपद सोडले हे चांगले केले परंतु त्याने कसोटी सामने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळायला पाहिजेत. त्याच्या मार्गदर्शनाचा संघाला नक्कीच फ़ायदा होईल.” असे सुनील गावसकर यांनी सोनी टेन १ टीव्हीशी बोलताना सांगितले.
एमएस धोनीने भारताकडून ९० कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३८.०९च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. ६० सामन्यात त्याने कर्णधार म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.