---Advertisement---

हीच ती चित्त्याची चपळाई! धोनीने 41व्या वर्षी दाखवला फिटनेस, थेट थ्रो करत फलंदाजाला केले Runout

MS-Dhoni-And-Dhruv-Jurel
---Advertisement---

गुरुवारी (दि. 27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाने महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाला 32 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा राजस्थानचा हंगामातील पाचवा विजय होता. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच, अव्वलस्थानी असलेल्या चेन्नई संघाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला, तरीही 41वर्षीय धोनीने दाखवलेली चपळाई चर्चेचा विषय बनली आहे. चला तर नेमकं धोनीने काय केलं आहे, हे आपण जाणून घेऊयात…

झाले असे की, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थानच्या डावातील अखेरचे षटक चेन्नई सुपर किंग्स संघाकडून मथीशा पथिराना टाकत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर पथिराना याने लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. यॉर्कर वाईड चेंडूवर देवदत्त पडिक्कल याला बॅटने चेंडूला स्पर्श करता आला नाही.

मात्र, यावेळी नॉन-स्ट्राईकवर असलेला फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) धाव घेण्यासाठी धावला. यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) याने चेंडू पकडत थेट स्टंप्सच्या दिशेने फेकला. यावेळी चेंडू स्टंप्सला (MS Dhoni Throw) लागला आणि जुरेलला तंबूचा रस्ता पकडावा लागला. यापूर्वी धोनीने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धही अशीच चपळाई दाखवली होती.

https://twitter.com/Pandeypiyush133/status/1651616654311448576

https://twitter.com/mahiban4u/status/1651614170289438720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651614170289438720%7Ctwgr%5Eb87f0de4cf931bdaec49f05fea56d7e57d1915bb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.latestly.com%2Fsocially%2Fsports%2Fcricket%2Fms-dhoni-hits-bullseye-as-he-runs-out-dhruv-jurel-with-direct-hit-during-rr-vs-csk-ipl-2023-match-5088170.html

https://twitter.com/master_love_b/status/1651612494367174660?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651612494367174660%7Ctwgr%5Eb87f0de4cf931bdaec49f05fea56d7e57d1915bb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.latestly.com%2Fsocially%2Fsports%2Fcricket%2Fms-dhoni-hits-bullseye-as-he-runs-out-dhruv-jurel-with-direct-hit-during-rr-vs-csk-ipl-2023-match-5088170.html

सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 202 धावा केल्या होत्या. या धावा करण्यात यशस्वी जयसवाल (77), ध्रुव जुरेल (34), देवदत्त पडिक्कल (27) आणि जोस बटलर (27) या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. कर्णधार संजू सॅमसन याला फक्त 17 धावा करता आल्या. तसेच, शिमरॉन हेटमायर याने 8 धावांची खेळी साकारली. यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे याने 4 षटके गोलंदाजी करताना 42 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या. याव्यतिरिक्त महीश थीक्षणा आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

दुसरीकडे, या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांना यावेळी निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 170 धावाच करता आल्या. चेन्नईसाठी शिवम दुबे (52), ऋतुराज गायकवाड (47), मोईन अली (25), रवींद्र जडेजा (25) आणि अजिंक्य रहाणे (15) यांनी योगदान दिले, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले.

चेन्नईच्या पुढील सामन्याबाबत बोलायचं झालं, तर चेन्नई संघ 30 एप्रिल रोजी पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. या सामन्यात विजय मिळवून चेन्नई संघ पुन्हा प्ले-ऑफसाठी दावेदारी ठोकण्याचा प्रयत्न करेल. (ms dhoni run out cricketer dhruv jurel with direct hit in rr vs csk 37th match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयसवालला ‘यशस्वी’ होण्यापासून रोखण्यात ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ही फेल, ‘इतक्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी
‘रॉयल नाम सुनकर आरसीबी समझे क्या? RCB नहीं…’, चेन्नईच्या पराभवानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---