टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो क्रिकेट विश्वात कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध आहे.
पत्रकार भरत सुंदरसेन यांनी त्यांच्या ‘द धोनी टच’ या धोनीवरील पुस्तकात २००८ सालच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील धोनीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा खुलासा केला आहे.
२००८ साली भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीरंगी मालिका झाली होती.
या मालिकेतील एका सामन्यात भारताने रिकी पॉटींगच्या ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला होता.
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १५९ धावात रोखले होते. त्यानंतर भारताने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ४५.५ षटकात हा सामना जिंकला होता.
भारताला हा सामना जिंकण्यासाठी १० धावांची गरज असताना धोनीने ग्लोज बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गोल्ज घेवून आलेल्या खेळाडूपाशी धोनीनी, या विजयानंतर सेलिब्रेशन करु नका असा निरोप ड्रेसिंग रुममध्ये पाठवला होता.
जर भारताने या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले असते तर, ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या स्वभावाप्रमाने पुढच्या सामन्यामध्ये जोरदार पुनरागमन केले असते. त्यामुळे धोनीने हा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ त्यांच्या कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे या वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा त्यांना कोणी डिवचते त्यावेळी ते सर्वस्व पणाला लावून खेळतात. त्यामुळेच धोनीने हा निर्णय घेतला होता.
भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेले तिरंगी मालिकेच्या तीन अंतिम सामन्यात भारताने २-० असा विजय प्राप्त करत मालिका जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-अॅडम गिलक्रिस्टचा विश्वविक्रम मोडत क्विंटन डी कॉकने रचला इतिहास
-या गोष्टीमुळे राहुल द्रविड झाला आनंदीत