भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या संपूर्ण कारकर्दीत जेवढे मैदानावर राज्य केले तेवढे लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच धोनीने असे काम केले आहे, जे ऐकून त्याच्याबद्दल आदर आणखी वाढेल. नुकतीच समोर आलेल्या एका बातमीनुसार धोनीने संघर्षांच्या दिवसात ज्या गाड्यावर चणे खाल्ले होते, त्याच चण्याच्या गाड्यावर जाऊन तो ३५ हजार रूपये ठेवून आला.
माध्यमांतील वृत्तानुसार धोनी ज्या गाड्यावर चणे खात होता, त्या गाड्यावाल्याचे नाव सुद्धा महेंद्र आहे. धोनीबद्दल बोलताना त्यांना गहिवरून आले होते व म्हणाले की धोनी कधी ही फुकट चणे खात नव्हता तो नेहमी पैसे देऊन खात होता. जेव्हा जेव्हा तो चणे खात असेल तेव्हा माझी आठवण नक्की काढत असेल.
धोनी जेव्हा रांची कॉलेजच्या मैदानात खेळायला येत असे तेव्हा तो महेंद्र यांच्या चण्याच्या गाड्यावर चणे खात असे. चणे विकणारे महेंद्र म्हणाले की, धोनी माझ्या गाड्यावर शांतपणे ३५ हजार रुपये ठेवून गेला, ज्यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली होती. धोनीने आनंदाने हे पैसे दिले, असे त्यांनी सांगितले.
धोनीने नुकताच आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ चा टी२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ७ संघांच्या ‘या’ आहे कर्णधार-उपकर्णधारांच्या जोड्या
‘आपण २०३० विश्वचषक आयोजित करण्याच्या पात्रतेचे आहोत का? केविन पीटरसनचा संतप्त सवाल
युरो कपनंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटूंना आली २०१९ विश्वचषकाची आठवण, इंग्लंड संघाला केले ट्रोल






