बुधवारी (12 एप्रिल) एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स हंगामातील चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला अखेरच्या चेंडूवर तीन धावांनी मात दिली. हा सामना धोनीसाठी एक विशेष सामना होता. कारण, या सामन्यात नेतृत्व करतात धोनी एकाच आयपीएल संघासाठी 200 कर्णधारपद भूषवणारा पहिला कर्णधार ठरला. याच पार्श्वभूमीवर त्याने सामन्या आधी झालेल्या छोट्या समारंभात आपल्या पहिल्या आयपीएलच्या आठवणी जागवल्या.
धोनी कर्णधार म्हणून चेन्नईसाठी 200 वा सामना खेळत असल्याने फ्रॅंचायजीकडून त्याचा सन्मान करण्यात आला. एन श्रीनिवासन यांनी त्याला स्मृतीचिन्ह भेट दिले. त्यावेळी धोनीने आयपीएलच्या पहिल्या हंगामावेळीच्या काही आठवणी सांगितल्या. तो म्हणाला,
“सर्वांसाठीच तो अनुभव एकदम नवा होता. माझ्याकडे कर्णधारपद आले होते. प्रथमच भारतीय खेळाडू, विदेशी खेळाडू आणि युवा भारतीय खेळाडू एकाच ड्रेसिंग रूममध्ये आलेले. मी या गोष्टीचा विचार करत होतो की वरिष्ठ विदेशी खेळाडू कसे वागतील?”
तो पुढे म्हणाला,
“मला वाटलेले मॅथ्यू हेडन रागात असेल आणि तो शिव्या वगैरे देईल. मात्र, जे घडले ते अनपेक्षित होते. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी हेडन हाच पहिला व्यक्ती होता, ज्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली. त्याने म्हटले आपण ब्रेट लीवर हल्ला चढवूया. मी त्याला हे कसे शक्य आहे असे म्हटल्यावर त्याने मी करेल, असे उत्तर दिले. प्रत्यक्ष सामन्यातही त्याने दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरच पुढे सरसावत त्याच्यावर आक्रमण केलेले.”
धोनीला हा मैलाचा दगड ठरणारा सामना आपल्या संघाला जिंकून देण्यात अपयश आले. मात्र, त्याने मैदानावर जोरदार फटकेबाजी करत सर्वांचे मन जिंकले.
(MS Dhoni Shared Some Chennai Super Kings Dressing Room Secreat Of IPL 2008 Talk About Hayden)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल
‘धोनी होता म्हणून…,’ सीएसकेला हरवल्यानंतर संदीप शर्माची सीएसके कर्णधाराविषयी काय म्हणाला