भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी(MS Dhoni) मागील अनेक दिवसांपासून विविध कारणाने चर्चेत आहे. आता त्याने मंगळवारी इंस्टाग्रामवर(Instagram) पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळेही तो पुन्हा चर्चेत आला आहे. या खास व्हिडिओमुळे धोनीला त्याच्या शालेय जीवनाची आठवण आली आहे.
धोनीने एका गल्ली क्रिकेटच्या (gully cricket) सामन्यातील काही क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसते की फलंदाज पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला पण तो ट्रायल बॉल होता असे म्हणत पुन्हा फलंदाजी करण्यासाठी तयार झाला.
मात्र पुढच्या चेंडूवरही गोलंदाजाने त्याला त्रिफळाचीत केले, त्यावेळी फलंदाज अंधार आहे म्हणून चेंडू दिसत नसल्याचे कारण सांगताना दिसून आला.
धोनीने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘जेव्हा तूम्हाला माहित असते काय होणार आहे आणि तूम्ही कॅमेरा चालू करता आणि पुढील 1 मिनिटात तूम्हाला हवी असणारी गोष्ट पहायला मिळते. अंधूक प्रकाशाबद्दल सॉरी. पण हा मजेशीर ट्रायल बॉल होता. पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय असतो.’
‘यामुळे शाळेतील आठवणी ताज्या झाल्या. जर हा व्हिडिओ आमच्याकडे नसता तर ह्या फलंदाजाने तो बाद असल्याचे कधीच स्विकारले नसते. क्रिकेट खेळताना आपण सर्वांनी हे एकदा तरी अनुभवले आहे.’
हा व्हिडिओ धोनी त्याच्या मित्रांसह क्रिकेटचा आनंद घेत असतानाचा असण्याची शक्यता आहे. याबद्दल धोनीने कॅप्शनध्ये काहीही स्पष्ट केलेले नाही.
https://www.instagram.com/p/B2yoyVjlKpE/
Wen U know what’s coming and start the camera and u get it in the nxt 1min, sorry for the bad light but it’s the lingo that’s fun trial ball, umpires decision last decision.brings back memory from school days.he wd… https://t.co/EW7U1K1X7j
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) September 24, 2019
सध्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे.
तसेच मंगळवारी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली ती पहिली सर्वात मोठी स्पर्धा होती. या विश्वचषकानंतर भारताने पुढे धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 चा वनडे विश्वचषकाचे तसेच 2013 ला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली अशी भावूक प्रतिक्रिया
–सांगलीकर स्म्रीती मंधनाने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिलीच भारतीय
–हरभजन, बुमराहलाही जे जमले नाही ते २२ वर्षीय दिप्ती शर्माने करुन दाखवले