चेन्नई। बुधवारी(1 मे) आयपीएल 2019 मध्ये 50 वा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात 80 धावांनी मोठा विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात इम्रान ताहीरने 3.2 षटकात 12 धावा देत 4 विकेट्स घेऊन मोलाचा वाटा उचलला.
हे चार विकेट्स घेतल्यानंतर ताहीरने केलेल्या जोरदार जल्लोषाची चर्चा चांगलीच रंगली. विकेट मिळाल्यानंतर मैदानावर लांबवर जोरात धावत जाऊन जल्लोष करण्याची ताहीरची शैली क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे.
त्याच्या या जल्लोषाबाबत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने बुधवारी झालेल्या सामन्यानंतर मजेशीर खूलासा केला आहे. धोनी म्हणाला, ‘ताहीरला जल्लोष करताना पाहून खूप मजा येते. पण मी आणि वॉटसनने आधीच स्पष्ट केले आहे की मी आणि तो त्याच्याजवळ जात नाही. कारण बऱ्याचदा जेव्हा त्याला विकेट मिळते तेव्हा तो दुसऱ्या बाजूला पळत जातो.’
‘मी आणि वॉटसन आम्ही पूर्णपणे फिट नसल्याने आम्ही तो सेलिब्रेशन करुन परत गोलंदाजीसाठी आल्यावर त्याला शुभेच्छा देतो आणि आमच्या जागेवर परत येतो.’
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 179 धावा केल्या होत्या. त्यानंतर 180 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 16.2 षटकात 99 धावांवरच संपुष्टात आला.
When Imran Tahir celebrates his wicket, Watson and I wait for him to return to his position and then congratulate ???????? – MS Dhoni pic.twitter.com/whVQ3lOBfA
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–चपळ धोनीने केले तीन चेंडूत दोन स्टम्पिंग, पहा व्हिडिओ
–आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक…
–सोशल मीडियावर अशी भावूक पोस्ट करत स्टिव्ह स्मिथने केले आयपीएल २०१९ला गुडबाय…





