---Advertisement---

धोनी आपला जिगरी दोस्त पोनीसह घालवतोय निवांत वेळ, पत्नी साक्षीने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 8:39 AM
MS Dhoni
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासमवेत निवांत वेळ घालवताना दिसत आहे. त्याचे त्याच्या घरी निवांत क्षणांचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला होता, जो व्हायरल होत आहे. 

तो आपला प्रिय घोडा पोनीसोबत वेळ घालवत आहे, याचा एक मजेदार व्हिडिओ साक्षीने शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या पोनीला काहीतरी खायला घालताना दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा बहुतांश वेळ रांचीमध्ये घालवत आहे. येथे त्यानी फार्महाऊसमध्ये कुत्र्यांसह अनेक अन्य प्राणी पाळले आहेत. यात परदेशी जातीचा एक घोडा देखील आहे. धोनी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो त्याच्या या खास मित्रांसोबत वेळ घालवायला विसरत नाही.

https://www.instagram.com/p/CYOfIiXh47y/

धोनीची बाइक्सची आवड कोणापासून लपलेली नाही. त्याचबरोबर धोनीला प्राण्यांबद्दलही खूप प्रेम आहे. याचा पुरावा म्हणजे त्यांचे रांची येथील फार्महाऊस. जिथे त्याने अनेक प्राणी पाळले आहेत.

धोनीने पोनी नावाचा घोडा गेल्या वर्षी खरेदी केला होता. या पोनीची धोनीशी असलेली मैत्री खास आहे. साक्षीशिवाय धोनी कर्णधार असलेली आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जनेही पोनीसोबतचा त्याचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये धोनी त्याच्या खास पोनीला काहीतरी खाऊ घालताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CYOtsQBBox1/

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द:
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. त्याने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने 2013 मध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 224 धावांची खेळी केली होती.

तसेच धोनीने त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले असून यात त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने 98 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1617 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाला टेंशन! ‘हा’ मुख्य गोलंदाज दुखापतग्रस्त, गोलंदाजी करताना अर्ध्यातच सोडले मैदान

आशिष नेहरा अहमदाबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक? आणखी दिग्गजांचीही सपोर्ट स्टाफमध्ये वर्णी

VIDEO: नव्या वर्षातील सर्वात ‘अफलातून’ झेल! ज्याने विहारीला दाखवला तंबूचा रस्ता

व्हिडिओ पाहा – क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार |

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---