दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यातील (sa vs ind test series) दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिका संघाने वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण अफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय संघाने शरणागती पत्करली. दक्षिण अफ्रिकेने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही अप्रतिम प्रदर्शन केले. याचे उदाहरण पहिल्या डावाच्या ३९ व्या षटकात पाहायला मिळाले.
भारतीय संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला हनुमा विहारी (hanuma vihari) पहिल्या डावाच्या ३९ व्या षटकात झेलबाद झाला. यावेळी दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा गोलंदाजी करत होता आणि रॅसी वॅन डर डुसेनने हा अप्रतिम झेल पकडला.
रबाडाच्या षटकातील चोथ्या चेंडूला अतिरिक्त बाउंस मिळाला आणि विहारीने चेंडूला खाली दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु, विहारीच्या बॅटच्या एका कोपऱ्यावर हा चेंडू लागल्यामुळे शॉर्ट लेगच्या दिशेने हवेत उडतो. त्याठिकाणी डुसेन क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. मात्र, चेंडू त्याच्यापासून लांब होता. असे असले तरी, त्याने योग्य वेळी उडी मारून झेल पकडला आणि विहारीला तंबूचा रस्ता दाखवला. चाहत्यांना डुसेनने घेतलेला हा झेल खूपच आवडला आहे. सोशल मीडियावर त्याने केलेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे कौतुक होत आहे. याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/OfficialCSA/status/1477971475105779715?s=20
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवसाचा विचार केला, तर भारतीय संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या फायदा फलंदाजांना करून घेता आला नाही. सलामीवीर आणि या सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलने (५०) अर्धशतक पूर्ण केले. त्याव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज अर्धशतकापर्यंत पोहोचू शकला नाही. भारताने मयंक अगरवाच्या (२६) रूपात पहिली विकेट १५ व्या षटकात गमावली. त्यानंतर संघाला एकप्रकारे गळती लागल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात भारताने ६३.१ षटकात २०२ धावा केल्या आणि पहिल्याच दिवशी संघ सर्वबाद झाला.
दक्षिण अफ्रिकेसाठी युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तसेच कगिसो रबाडा आणि ऑलिव्हियरने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेची धावसंख्या १ बाद ३५ आहे. कर्णधार डीन एल्गर (११) आणि किगान पीटरसन (१४) खेळपट्टीवर कायम आहेत.
महत्वाच्या बातम्या –
विराट-रहाणे आणि पुजाराला भारी पडला एकटा रूट! पाहा ही ‘अविश्वनिय’ आकडेवारी
साॅरी..साॅरी..! पहिल्याच सामन्यात मैदानावर कर्णधार राहुलला मागावी लागली माफी, पण का? पाहा व्हिडिओ
मनिंदर-नबीबक्षच्या ‘सुपर टॅकल’ने बंगालचा विजयरथ कायम! अटीतटीच्या सामन्यात जयपूरचा पराभव
व्हिडिओ पाहा –