भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. अनुभवी चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) यांनी खूपच खराब प्रदर्शन केले. भारताचे हे दोन्ही दिग्गज फलंदाज मागच्या जवळपास दोन वर्षांपासून खराब फॉर्मशी झगडत आहेत. कर्णधार विराट कोहली या सामन्यात अनुपस्थित असला, तरी मागच्या दोन वर्षातील त्याचे प्रदर्शन देखील समाधानकारक नाहीये.
विराट, रहाणे आणि पुजारा हे तिघेही भारतीय संघासाठी खूप महत्वाचे फलंदाज आहेत. मात्र, मागच्या दीर्घ काळापासून त्यांनी सतत निराशा केली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला, तर चेतेश्वर पुजाराने अवघ्या तीन धावा करून विकेट गमावली. कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट मात्र या सामन्यात पाठीच्या वेदनेमुळे अनुपस्थित आहे. विराटच्या अनुपस्थितीत केएल राहुल (kl rahul) भारताचे नेतृत्व करत आहे.
दरम्यान विराट, रहाणे आणि पुजाराचे डिसेंबर २०१९ पासूनचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन पाहिल तर, ते खूपच निराशाजनक राहिले आहे. या तिघांनी २०१९ च्या डिसेंबर महिन्यापासून खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये एकूण २२७१ धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्यांची सरासरी २५.२३ होती. यादरम्यानच्या काळात तिघांनी फक्त एक कसोटी शतक केले आहे आणि १२ वेळा शून्यावर विकेट (डक) गमावल्या आहेत.
तर, दुसरीकडे इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने या तिघांना भारी पडेल असे प्रदर्शन केले आहे. जो रुटच्या डिसेंबर २०१९ पासूनच्या कसोटी प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने ५४.८५ च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने सहा शतके ठोकली असून, तो फक्त एकदा शून्यावर बाद झाला.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सुरुवात भारतासाठी समाधानकारक राहिली नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव २०२ धावांवर गुंडाळला गेला. केएल राहुलने यामध्ये सर्वाधिक ५० धावा केल्या, तर रविचंद्रन अश्विनने ४६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेसाठी पहिल्या डावात मार्को जेन्सनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर ऑलिव्हियर आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
…आणि ऑलिव्हियरने केली गावसकरांची बोलती बंद! काय घडले कसोटीच्या पहिल्या दिवशी? वाचा सविस्तर
द्रविडने जागवल्या जोहान्सबर्गमधील पहिल्या शतकाच्या आठवणी; ‘त्या’ साथीदाराचे केले कौतुक
निवृत्तीनंतर फावल्या वेळेत क्विंटन डी कॉक जपतोय आपला छंद, मासे पकडतानाचा फोटो केला शेअर
व्हिडिओ पाहा –