भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी अलीकडेच त्याच्या दोन छोट्या चाहत्यांना भेटला आणि त्यांना ऑटोग्राफ दिल्यानंतर, त्याने त्यांच्यासोबत छायाचित्रांसाठी पोझ देखील दिली. अशा प्रकारे धोनीने आपल्या छोट्या चाहत्यांचा दिवस बनवला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेटच्या मैदानातून बाहेर असला तरी, त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. धोनीचे सतत कोणते तरी फोटो अणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता बुधवारी, 30 ऑगस्ट रोजी धोनीच्या एका फॅन पेजने त्याच्या ट्विटर हँडलवरून धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या दोन छोट्या चाहत्यांना बॅटवर ऑटोग्राफ देतो आणि नंतर दोन्ही मुलांना त्याच्या शेजारी बसवून फोटो काढताना दिसत आहे.
Video of the day! 🥺♥️@MSDhoni #MSDhoni #WhistlePodu pic.twitter.com/XLQTbcjMZA
— DHONI Era™ 🤩 (@TheDhoniEra) August 30, 2023
काही दिवसांपूर्वी धोनीचा विमानतीला देखिल व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तो विमानातून प्रवास करताना कँडी क्रश गेम खेळताना दिसला होता. सोबतच एक हवाई सुंदरी त्याला चॉकलेट देताना दिसली होती. धोनीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
भारतीय दिग्गज धोनी शेवटचा आयपीयल 2023 मध्ये खेळताना दिसला होता. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत पाचवे विजेतेपद पटकावले. मेगा इव्हेंटमध्ये धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्याला गुडघेदुखीचा त्रास होत होता. या कारणास्तव धोनीने या स्पर्धेत अनेकवेळा आपली फलंदाजीची स्थिती बदलली आणि त्याला अनेक वेळा विकेटच्या दरम्यान धावताना समस्यांना सामोरे जावे लागले.
मात्र, असे असतानाही धोनीने आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीच्या जोरावर स्पर्धेत आपली छाप सोडण्यात यश मिळवले. स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सध्या तो संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे. (ms dhoni spending time with his child fans video viral)
महत्वाच्या बातम्या-
तुफानी अर्धशतकाचे टीम डेव्हिडला बक्षिस! ऑस्ट्रेलिया निवडसमितीचा मोठा निर्णय
दुखापतग्रस्त असलेल्या खेळाडूंबाबत श्रीलंकन कर्णधाराचे वक्तव्य, म्हणाला आम्हच्याकडे युव खेळाडू…