---Advertisement---

तयारी सुरू! आयपीएल 2023 गाजवण्यासाठी तीन महिने आधीच मैदानावर उतरला ‘थला’; पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जानेवारी 19, 2023 9:28 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी आहे. आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या हाती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आता दोन्ही आपली अखेरची आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. त्याचा सराव करताना चा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला.

सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसतोय. रांची येथील जेएससीए स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये सराव करतोय. आयपीएल 2023 ही स्पर्धा यावर्षी एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच धोनी अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. धोनीने यापूर्वीच चेन्नईमध्ये आपला अखेरचा आयपीएल सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केलेली.

 

चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच, चॅम्पियन्स लीग जिंकण्यातही चेन्नईला यश आलेले. मात्र, मागील तीन पैकी दोन हंगामात चेन्नईला अपयश आलेले दिसते. 2020 व‌ 2022 आयपीएल वेळी चेन्नईला प्ले ऑफसाठी पात्रता मिळवण्यात अपयश आलेले. मात्र, 2021 मध्ये त्यांनी विजेतेपद आपल्या नावे केलेले. चेन्नईचे सर्व खेळाडूही धोनीला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न करतील.

धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने वनडे व टी20 विश्वचषक जिंकलेला. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पटकावलेली. 2019 वनडे विश्वचषकात आपला अखेरचा सामना खेळल्यानंतर त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलेला.

(MS Dhoni Starts Practice Ahead IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

भारतीय दिग्गजाने विराटला दिला रणजी खेळण्याचा सल्ला; म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्ध…”
पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---