भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असणारा एमएस धोनीने काल इंडिज संघाविरुद्ध खेळताना जबदस्त अर्धशतकी खेळी केली. यामुळे त्यालाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
परंतु काल या खेळाडूने असा एक विक्रम बनवला की त्याची दखल कायम भारतीय क्रिकेट विश्वात घेतली जाईल. भारताकडून खेळताना या खेळाडूने एकदिवसीय कारकिर्दीत २९१ सामन्यात ९२६८ धावा केल्या आहेत. तर भारत आणि आशिया अशा दोन संघांकडून खेळताना एकदिवसीय कारकिर्दीत त्याने २९४ सामन्यांत ९४४२ धावा केल्या आहेत.
यामुळे सार्वकालीन एकदिवसीय सामन्यात सार्वधिक धावा भारतासाठी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने भारताच्या माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला मागे टाकले आहे. अझहरुद्दीनच्या नावावर ३३४ सामन्यांत ९३७८ धावा आहेत.
विशेष म्हणजे ९४०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये एमएस धोनीची सरासरी सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५१.३१ इतकी आहे. भारताच्या या सर्वात यशस्वी कर्णधाराला ३०० सामने खेळण्यासाठी आता फक्त ६ सामन्यांची गरज आहे.