---Advertisement---

यष्टिरक्षक धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

---Advertisement---

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक एम एस धोनीने जास्त धावा केल्या नसल्या तरी यष्टिरक्षणात मात्र अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात खेळताना रिझा हेन्ड्रिक्सचा झेल घेऊन एक खास विक्रम केला.

यष्टीरक्षक म्हणून धोनीचे टी २० मध्ये १३४ झेल झाले आहेत. त्यामुळे तो टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने कुमार संगकाराचा १३३ झेलांचा विक्रम मागे टाकला आहे.

धोनीने हे १३४ झेल घेण्यासाठी २६२ डाव खेळले आहेत. टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये धोनी आणि संगकाराच्या पाठोपाठ १२३ झेलांसह भारताचाच यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आहे.

याआधी धोनीने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील ६०० झेलांचा टप्पा पार केला होता. हा टप्पा पार करणारा तो केवळ तिसराच खेळाडू ठरला होता. तसेच लिस्ट अ प्रकारच्या (अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ) क्रिकेटमध्येही त्याने यष्टींमागे ५०० बळी घेण्याचा विक्रम केला होता. याबरोबरच त्याने वनडेत यष्टींमागे ४०० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे.

टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षक:

एमएस धोनी – १३४ झेल
कुमार संगकारा – १३३ झेल
दिनेश कार्तिक – १२३ झेल
कामरान अकमल – ११५ झेल
दिनेश रामदिन – १०८ झेल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment