इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. दुबईच्या स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने ४ विकेट्सने बाजी मारली आणि अंतिम सामन्यातील आपले स्थान पक्के केले. चेन्नई संघाच्या या विजयात इतर खेळाडूंसह कर्णधार एमएस धोनी याचाही मोलाचा वाटा राहिला. त्याने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत संघाला अविस्मरणीय असा विजय मिळवून दिला. दरम्यान त्याने भर मैदानात असे काही केले की, सामन्यानंतर सोशल मीडियावर फिक्सरकिंग्ज (#Fixerkings) असा ट्रेंड सुरू झाला आहे.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली संघाचे डावातील १६ वे षटक सुरू होते. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील सहाव्या चेंडूवेळी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत स्ट्राईकवर होता. अशात मैदानी पंचांनी त्याचा हा शेवटचा चेंडू वाईड दिला. त्यामुळे दिल्लीला अधिकची १ धावही मिळाली. पंचांच्या या निर्णयावर वेगवान गोलंदाज शार्दुल नाखुश दिसला.
हे षटक संपल्यानंतर अगदी चेन्नईचा संघनायक धोनीनेही पंचांना त्यांच्या या निर्णयाबाबत जाब विचारला. त्याचे हेच कृत्य कॅमेरात कैद झाले आणि सोशल मीडियावर त्यासंबंधीचे फोटो व्हायरल होत आहेत.
At the age of 40 He's Fixing the matches not Finishing 😆😆😆#fixerkings pic.twitter.com/DdRiAwb8hE
— |K|itT|U| (@Neel_maniac) October 11, 2021
Turning point of the match
😳😳😳#fixerkings https://t.co/OPPw0rcvru— ۵𝐏𝐫𝐢𝐭𝐡𝐯𝐢ツᵒᶠᶠᶤᶜᶤᵃˡ🔥🧊 (@prithiv_45) October 11, 2021
मागील आयपीएल हंगामातही धोनीचा रुद्रावतार पाहून सामना पंचांनी त्यांचा निर्णय बदलला होता. त्यांनी चेंडूला वाइड देता देता आपला निर्णय थांबवला होता. यानंतर आता पुन्हा अंतिम सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या सामन्यातही त्याने असेच काहीसे कृत्य केल्याने सोशल मीडियावर फिक्सरकिंग्ज हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला आहे.
https://twitter.com/Dhoni_workshop/status/1447229343818682368?s=20
https://twitter.com/Prince19M76/status/1447233414193549321?s=20
दरम्यान धोनीने चेन्नई संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दिल्लीच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अंतिम २ षटकात फलंदाजीला येत १८ धावांची आक्रमक खेळी केली होती. ६ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने १९.४ षटकातच हा सामना खिशात घातला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्स ऑफिसमध्ये सलमान आणि मोठ्या सामन्यात…’, जुना संघसहकारी केदारकडून धोनीचे खास शब्दांत कौतुक
कोण म्हणतं धोनी सोप्या मॅच अवघड करतो? आकडे तर वेगळंच काहीतरी सांगतायेत