---Advertisement---

‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ फेम सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या

---Advertisement---

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो ३४ वर्षांचा होता. सध्या मुंबई पोलिस घटनेची तपासणी करत आहेत.

सुशांतने या आधी काही क्रीडा क्षेत्रातील चित्रपटात काम केले आहे. यातील त्याचा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. त्यावेळी त्याने धोनीची भूमिका हुबेहुब निभावल्याने मोठे कौतुक झाले होते.

याव्यतिरिक्त त्याने ‘काय पो छे’ या बॉलिवूड चित्रपटात त्याने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची आणि क्रिकेट शिकवणाऱ्या कोचचीही भूमिका केली होती. त्याचा छिछोरे हा शेवटचा चित्रपट होता.

त्याच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

गौतम गंभीर म्हणतो; जर धोनी कर्णधार बनला नसता, तर त्याने केली असती ही गोष्ट…

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडचे नेतृत्व करण्यास बेन स्टोक्स सज्ज

सचिन तेंडुलकरने दिला आयसीसीला सल्ला, जर चेंडूला लाळ लावता येणार नसेल तर…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---