---Advertisement---

ठरंल! या दिवशी एमएस धोनी करणार आयपीएल २०२० साठी ट्रेनिंगला सुरुवात

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 6:45 PM
---Advertisement---

29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या आयपीएलच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी 2 मार्चपासून चेन्नईमध्ये सरावाला सुरुवात करणार आहे.

यावेळी त्याच्यासह सुरेश रैना, अंबाती रायडू हे खेळाडू देखील सराव करण्याची शक्यता आहे. रैना आणि रायडू हे दोघेही मागील 3 आठवड्यांपासून चेन्नईमध्ये सराव करत आहेत.

धोनीबद्दल सीएसकेचे सीईओ केेस विश्वनाथन यांनी माहिती दिली की ‘धोनी एमए चिदंबरम स्टेडियमवर 2 मार्चपासून सरावाला सुरुवात करेल. तो त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या खेळाडूंबरोबर सराव करेल. पूर्ण ट्रेनिंग कॅम्पला 19 मार्चपासून सुरुवात होईल. त्यावेळी संघातील सर्व खेळाडू एकत्र येतील.’

धोनीने जुलै 2019च्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने त्याला वार्षिक मानधन करारातूनही वगळले आहे. त्यामुळे धोनीच्या भविष्याबद्दल भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा होत आहे.

असे असले तरी आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करताना दिसणार आहे. यावर्षीच्या आयपीएल 2020 मध्ये 29 मार्चला वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना पार पडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---