2019 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. पण अजून तरी अधिकृत माहिती धोनीने दिलेली नाही.
तसेच रविवारी(21 जूलै) पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यातूनही धोनीने माघार घेतली आहे. त्याच्या अनुपलब्धतेबद्दल सांगताना निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रिषभ पंतला आता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तयार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी धोनीबरोबर चर्चा केली असल्याचेही सांगितले आहे.
पण आता डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार धोनी विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार होता, पण त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने निवृत्ती घेण्यापासून रोखले. मागील काही काळात धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण प्रत्येक वेळी विराटने त्याला पाठिंबा दिला होता.
विराटच्या जवळ असणाऱ्या एका सुत्राने सांगितले की ‘विराटने धोनीला लगेचच निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नंतर त्याचे मन बदलले.’
‘विराटला वाटते की धोनीला कुठलीही फिटनेस समस्या नाही आणि तो संघाला गरज असेल तर पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकापर्यंत खेळू शकतो. यामागील कारण हे की पंतला तयार करायचे आहे. भारतीय संघला पंत व्यतिरिक्त दुसरा यष्टीरक्षक नको आहे. आणि जर पंतला काही दुखापत झाली किंवा तो लयीत(फॉर्ममध्ये) नसला तर धोनी कोणत्याही समस्येशिवाय येऊ शकतो.’
असे असले तरी अजून धोनीच्या निवृत्तीबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त आलेले नाही. तसेच कोणत्याही खेळाडूने याबद्दल भाष्य केलेले नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–चांगल्या कामगिरीनंतरही टीम इंडियात निवड न झाल्याने हा खेळाडू झाला निराश
–बेन स्टोक्सचा नकार; या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी केली विलियम्सनची शिफारस
–वनडे, टी२० नंतर आता कसोटीमध्येही क्रमांक आणि नाव असलेली जर्सी घालणार इंग्लंडचे खेळाडू