इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी खूप निराशाजनक राहिला. त्यांना संपूर्ण हंगामात १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले. त्यामुळे चेन्नईला गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच झाले की, चेन्नई हंगामातील १० सामने पराभूत झाले आहेत. दरम्यान, चेन्नईने या हंगामात काही युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. मात्र, राजवर्धन हंगारगेकर याला एकही सामन्यात खेळवले नाही. याबद्दल चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नई २० मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२२ मधील अखेरचा सामना खेळले. या सामन्यात देखील चेन्नईला ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी धोनीने हंगारगेकरबद्दल मत व्यक्त केले.
धोनी म्हणाला, ‘तो असा गोलंदाज आहे, जो चांगल्या लेंथने गोलंदाजी करतो. त्याच्या गोलंदाजीत उसळी आहे, पण या स्तरावर प्रदर्शन करण्यासाठी त्याला अन्य काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठीही वेळ दिला पाहिजे. जेव्हा तुम्ही १९ वर्षांखालील क्रिकेटमधून येतो, तेव्हा तुम्ही खूप प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले नसते. आम्हाला खेळाडूंना तयार करायचे आहे आणि त्यांना पुरेशी संधी द्यायची आहे.’
तसेच धोनी म्हणाला, ‘राजवर्धन हंगारगेकर आम्ही खरंच उत्साहीत आहोत. कारण, खरंच तो मजबूत आहे. पण असे काही क्षेत्र आहेत, जिथे आम्हाला असे वाटते की, त्याने सुधारणा कराव्यात. या हंगामात हेच होत आहे. त्याच्याबरोबर प्रशिक्षक आणि सिनियर खेळाडूंनी काम केले आहे.’
हंगारगेकरला चेन्नईने आयपीएल २०२२ लिलावातून १.५० कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो याचवर्षी झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता. हा विश्वचषक भारताने आपल्या नावावर केला होता. या १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याने केवळ ५ विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. विश्वचषकादरम्यान तो संघासाठी एक उत्तम खेळाडू म्हणून समोर आला होता. त्याच्या स्विंग गोलंदांजीने सर्वांना प्रभावित केले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘अविश्वसनीय रूपाने फिट व्यक्ती आहे धोनी’, थालाच्या आयपीएल २०२३ खेळण्याच्या निर्णयावर बोलले शास्त्री






