---Advertisement---

भारताच्या पराभवानंतर ‘मेंटर धोनी’ होतोय ट्रेंड; चाहते म्हणाले…

---Advertisement---

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय सोशल मीडियावर भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

भारतीय संघाचा झाला नामुष्कीजनक पराभव
टी२० विश्वचषक मोहिमेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला पाकिस्तानकडून १० गड्यांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दुबई येथे रविवारी (३१ ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ गड्यांनी मात दिली. या पराभवामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा अंधुक झाल्या आहेत. भारताला उर्वरित तीनही सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच, इतर सामन्यांच्या निकालावरही भारतीय संघाचे लक्ष असेल.

धोनी होतोय ट्रेंड
न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होऊ लागला आहे. एका चाहत्याने एक मीम शेअर करत ‘मी यांचा मेंटर नाही हा’ असे धोनी म्हणत असल्याचे दाखविले.

एका चाहत्याने धोनी हा संघातील युवा खेळाडू ईशान किशन व इतर खेळाडूंना मार्गदर्शन करतानाची छायाचित्रे शेअर केली. त्याला कॅप्शन देत,
‘मेंटरने आपली जबाबदारी चोख पार पाडली’ असे लिहिले.

या पराभवानंतर धोनीची भावमुद्रा

https://twitter.com/iamCAom/status/1454834377033064453?t=Sal6i0d04o1yka1C2RTtcg&s=19

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---