जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यामुळे, सर्व खेळाडू आपापल्या संघाच्या बायो बबलमध्ये जमू लागले असून चेन्नई सुपर किंग्स संघाचे खेळाडूही मुंबईत जमले आहेत. यादरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतम याने सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले आहे.
तो खेळाडूंचीज्ञ क्षमता जाणतो…
गौतमने धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना सांगितले की, तो आपल्या संघातील खेळाडूंचे कसब व क्षमता जाणतो. सीएसकेच्या अधिकृत संकेतस्थळावर बोलताना गौतम म्हणाला, “धोनीच्या नेतृत्वात खेळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. कारण, माही भाई गोलंदाजाची मजबूत बाजू जाणतो आणि गोलंदाजांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतो. सीएसकेसारख्या चॅम्पियन संघाबरोबर खेळत असूनही, मला कोणत्याही प्रकारे अपेक्षेचा दबाव जाणवत नाही.”
चेन्नईचा भाग बनला आहे गौतम
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारा गौतम आक्रमक फलंदाज व उपयुक्त ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. २०१८ मध्ये तो सर्वप्रथम आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. दोन वर्ष राजस्थानसाठी खेळल्यानंतर मागील वर्षी त्याने किंग इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले होते. यावर्षीच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ९.४० कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
सीएसकेने आयपीएल लिलावात गौतमसह मोईन अली, चेतेश्वर पुजारा यासारख्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. सीएसके आपल्या हंगामाची सुरुवात १० एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध करेल. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात मागील वर्षी प्रथमच प्ले- ऑफमध्ये प्रवेश केला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र, चेन्नईला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्ससाठी आनंदाची बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला ‘हा’ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज
मोठी बातमी! रोड सेफ्टी सिरीज नडली? सचिनचा युसूफ, बद्रीनाथपाठोपाठ तिसरा संघसहकारी कोरोना पाॅझिटीव्ह