---Advertisement---

अशक्य ते शक्य करून दाखवतो, तो आहे धोनी…! कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्टंपिंग, पाहा एकाच व्हिडिओत

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 1:03 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने गेली अनेक वर्षे क्रिकेटच्या खेळपट्टीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. फलंदाजी करताना हा खेळाडू आक्रमक फलंदाजी करून मोठमोठे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या हेलिकॉप्टर शॉटने तर क्रिकेट चाहत्यांना अक्षरशः वेड लावून ठेवले आहे. तर यष्टिमागे देखील एमएस धोनीचा जलवा अजूनही कायम आहे. विजेच्या वेगाने हा यष्टिरक्षक, फलंदाजाला यष्टीचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवतो. दरम्यान एमएस धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यावर चाहतेही आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एमएस धोनी वाऱ्याच्या वेगाने फलंदाजाला यष्टीचीत करताना दिसून येत आहे. जेव्हा एमएस धोनी यष्टीच्या मागे उभा असतो त्यावेळी फलंदाज आधीच गोंधळून गेलेला असतो. कारण इतर कुठलाही यष्टीरक्षक चूक करेल परंतु धोनीकडून चूक होणे जवळपास अशक्य आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, धोनीच्या आयुष्यातील सर्वात जास्त आठवणीत राहतील असे क्षण एकत्रित करण्यात आले आहे. आर अश्विन,कुलदीप यादव, युझवेंद्र चहल,रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज धोनी यष्टीमागे असताना हवी तशी गोलंदाजी करू शकत होते. कारण फलंदाजाने एक चूक केली म्हणजे तो बाद होणार, हे नक्कीच होते. कारण चेंडू हातात आला की डोळ्याची पापणी पडायच्या आधी तो फलंदाजाला यष्टीचीत करायचा.

याच व्हिडिओत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट यष्टीचीत विकेटचाही क्षण दाखवला आहे. यामध्ये फलंदाज चेंडू हुकल्यानंतर यष्टीमागे गेल्यावर मागेही वळून पाहात नाही. कदाचित यष्टीमागे धोनी असल्याची जाणीव त्याला असावी. धोनीही अगदी वेगाने त्याला यष्टीचीत करताना दिसतो आहे.

MS Dhoni: The quickest hands in the east

यष्टीरक्षक म्हणून धोनीची कारकीर्द
एमएस धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत विकेट्स घेण्याचा पराक्रम एमएस धोनीच्या नावे आहे. धोनीने १९५ फलंदाजांना यष्टीचीत करून माघारी धाडले आहे. तसेच टी -२० सामन्यातील एकाच डावात यष्टिरक्षक म्हणून सर्वात जास्त फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम देखील एमएस धोनीच्या नावे आहे. त्याने २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५ विकेस घेतल्या होत्या. तसेच यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत एमएस धोनी तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८२९ फलंदाजांना माघारी पाठवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकचं आठवला; दशकानंतर कॅप्टनकूल धोनीचा ‘जादुई’ षटकार, जुन्या आठवणी झाल्या ताज्या

धोनीने पंचांचाच काढला घाम! मुद्दाम घेतला चुकीचा रिव्ह्यू अन् ड्रेसिंग रूमकडे मारली कूच

रोना मना हैं! भावुक झालेल्या पदार्पणवीरासोबत नारायणची गमतीशीर कृती, कर्णधारालाही फुटलं हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---