२० षटकांच्या प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगने केवळ क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली नाही, तर क्रिकेटपटूंमधील संबंधांनाही घट्ट बनवले आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये क्रिकेटविश्वातील वेगवेगळ्या संघातील क्रिकेटपटू सहभागी होतात. त्यामुळे कित्येक खेळाडूंमध्ये आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. विराट कोहली आणि एबी डिविलियर्सची मैत्री, सचिन तेंडूलकर आणि रिकी पाँटिंग यांचे एका संघाकडून खेळल्यामुळे वाढलेली जवळीक, ही याची काही उदाहरणे आहेत.
तसेच बऱ्याचदा सामना झाल्यानंतर विरुद्ध संघातील क्रिकेटपटूंमध्येही चांगली बाँडिंग असल्याची झलक पाहायला मिळते. असंच काहीसं आयपीएल २०२०च्या १८व्या सामन्यानंतर पाहायलं मिळालं. हा सामना ४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला होता. या सामन्यात चेन्नईने १० विकेट्सने मिळवला होता.
सामना झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटू लागले होते. दरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आनंदाने ख्रिस गेलच्या अंदाजात चालत त्याला भेटण्यासाठी गेला. हे पाहून गेलदेखील भलताच खुश झाला. धोनी क्वचितच अशा गोष्टी करताना दिसतो. त्यामुळे गेलच्या चालण्याच्या स्टाईलची नक्कल करणाऱ्या धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
https://twitter.com/DhoniGifs/status/1313352290347053057?s=20
युनिव्हर्सल बॉस गेल यावर्षी आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. पण त्याला अद्याप पंजाबकडून एकही सामना खेळायला मिळालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
रैनाला संधी मिळाली नाही, परंतू त्याने घडवलेला क्रिकेटर मात्र गाजवतोय आयपीएल
बापरे! ८६ आयपीएल सामने खेळलेल्या स्मिथच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
‘या’ १९ वर्षीय भारतीय खेळाडूत मला ब्रेट ली दिसतोय.. पाहा बेन स्टोक्सने कोणाची केलीये तुलना
ट्रेंडिंग लेख-
संघाला चॅम्पियन बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा, तरीही राहिले दुर्लक्षित; पाहा आयपीएलमधील अभागी खेळाडू
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
दुर्दैवी…! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले ३ फलंदाज; विराटचाही आहे समावेश