भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा धोनी हा एकमेवर कर्णधार आहे. पण व्यावसायातील त्याच्या जुन्या भागीदारांनीच भारतीय दिग्गजाची फसवणूक केली, अशी माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार माजी कर्णधाराला 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातला गेला आहे.
माहितीनुसार मिहीर दिवाकर आणि सौम्य विश्वाश या दोघांनी एमएस धोनीसोबत पैशांचा गैरव्यावहार केला आहे. अरका स्पोर्ट्स ऍन्ड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये धोनीने हे पैसे गुंतवले होते. दिवाकर आणि विश्वाश यांच्यानी धोनीसोबत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी बनवण्यासाटी 2017 साली हा करार केला होता. पण या दोघांकडून कराराच्या अटी पूर्ण झाल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर एमएस धोनीने या दोघांवर 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप केले आहेत.
अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंटला कराराच्या अटींनुसार फ्रँचायझी फी भरणे आणि नफ्याचे पैसे वाटून घेणे बंधनकारक होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. वारंवार पत्र देऊनही, कराराच्या अटींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, ज्यामुळे एमएस धोनी याने फर्मला 15 ऑगस्ट 2021 रोजी दिलेले अधिकार पत्र रद्द केले. धोनीने अनेक कायदेशीर नोटिसाही पाठवल्या, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
धोनीच्या वकिलाने सांगितल्याप्रमाणे रांचीतील न्यायालयात हा फौजदारी खटला दाखल केला गेला आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीने धोनीला धोका दिला असून यात 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसता झाले आहे. त्यानंतरच धोनीने खटला दाखल करण्याचे हे पाऊल उचलले.
महत्वाच्या बातम्या –
परदेशात कसोटी जिंकून देण्यात ‘या’ सहा खेळाडूंचा नादच खुळा, सचिन आसपासही नाही
‘जर असं झालं तर मी निवृत्ती घेईन…,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूचं धक्कादायक विधान