चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी धोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे आपल्याला दिसून येत असते. एकीकडे धोनी त्याच्या पहिल्या मॅचबद्दल उत्सुक असताना त्याच्या बायकोला मात्र तिच्या शाळेचे दिवस आठवत आहेत. साक्षी धोनीने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचे शाळेतील काही फोटो टाकले आहेत, जे बघून आपल्याला हीच का ती साक्षी धोनी? असे वाटू शकते.
साक्षी धोनीने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचे २ फोटो शेअर केले आहेत, ज्यातून ती नेमकी कोणती ते ओळखू येत नाही. साक्षी लहानपणी तिच्या मुलीसारखी दिसत होती. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनी यांची मुलगी असलेली जिवा तिच्या आईचे प्रतिबिंब आहे.
या फोटोवर साक्षी लिहिते की, ‘आपण कुठे गेलो हे जाणून घेण्यात लोकांना उत्सुकता असते, लोकांना माहित करून घ्यायचे असते की, तुम्ही कोण आहेत. त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की आम्ही वेलमेट्स आहोत. धन्यवाद या आठवणींना जिवंत ठेवल्याबद्दल.’
वेलमेट्स म्हणजे डेहराडून येथील वेल्हाम शाळेच्या मुली आहेत. रिक्षात बसलेल्या मुलींमध्ये साक्षीला ओळखणे खूप अवघड आहे; तरी आपण ती कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिक्षावाल्या भैय्याच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर साक्षी आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे.
https://www.instagram.com/p/CNZ8Tp3HjOX/?utm_source=ig_web_button_share_sheet
साक्षीचे शिक्षण डेहराडून येथे झाले. नंतर तिच्या वडिलांची बदली झाली आणि मग ते रांचीला गेले. बऱ्याच कमी लोकांना माहित असेल की साक्षी आणि धोनी एकाच शाळेत शिकत होते. परंतु ते एकमेकांना त्यावेळी ओळखत नसतं. २००८ या वर्षी धोनी आणि साक्षीची पहिली भेट झाली. ईडन गार्डनवर तेव्हा भारत पाकिस्तान मॅच होणार होती आणि धोनी व त्याची टीम ताज हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा त्या दोघांचे युद्धजीत दत्त मित्र होते. त्यांनीच दोघांची ओळख करून दिली.
त्यानंतर ४ जुलै २०१० ला त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांना ६ फेब्रुवारी २०१५ ला मुलगी झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने बराचस काळ कुटुंबाच्या सानिध्यात घालवला. धोनीच्या चेन्नई टीमचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स संघासोबत मुंबईत होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय कसोटीपटूंना आयपीएल २०२१ साठी मिळणार स्पेशल मुभा, करता येणार ‘ही’ गोष्ट
कधीकाळी गॅस सिलेंडर पोहोचवायचा; ‘किंग खान’च्या केकेआरची पडली नजर आणि एका रात्रीत पालटलं आयुष्य