---Advertisement---

पत्नी साक्षीच्या ‘त्या’ वक्तव्यावर धोनीचे स्पष्टीकरण; म्हणाला, ‘मी पत्नीला तमिळ भाषेतील घाणेरडे शब्द…’

MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणारा माजी कर्णधार एमएस धोनी आता नव्या व्यवसायात उतरला आहे. धोनीने नुकतेच त्याच्या तमिळ प्रॉडक्शनच्या ‘लेट्स गेट मॅरिड’ या पहिल्या सिनेमाचा ऑडिओ आणि ट्रेलर लाँच केला. चेन्नईच्या एका कार्यक्रमात धोनीची पत्नी साक्षी धोनी हीदेखील हजर होती. यादरम्यान कार्यक्रमात धोनी आणि साक्षी खूपच मजा-मस्ती करताना दिसले. आता या क्यूट जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

यादरम्यान एमएस धोनी (MS Dhoni) याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिने एका विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर, साक्षी म्हणाली की, तिला तमिळ भाषेतील घाणेरडे शब्द माहिती आहेत. यावर धोनी लगेच आपले स्पष्टीकरण देताना दिसला. चला तर जाणून घेऊयात, धोनी नेमकं काय म्हणाला.

साक्षीच्या विधानावर धोनीची प्रतिक्रिया
खरं तर, धोनी त्याच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या ‘लेट्स गेट मॅरिड’ (Let’s Get Married) या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी आला होता. यादरम्यान सिनेमाच्या निर्मितीविषयी त्याने चर्चा केली. त्याने आपल्या भाषणात पुढे म्हटले की, चेन्नईशी त्याचे खूपच जुने नाते आहे. धोनी सन 2008पासून आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाशी जोडला आहे. तो म्हणाला की, चेन्नईनमध्येच त्याने कसोटी पदार्पण केले होते. ही जागा त्याच्यासाठी नेहमीच खास राहिली आहे. यावेळी तो पत्नीसोबत स्टेजवर मस्ती करतानाही दिसला.

साक्षीने म्हटले की, तिला तमिळ भाषेतील काही घाणेरडे शब्द माहिती आहेत. या वक्तव्यानंतर धोनीने वेळ न घालवता स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, “मी माझ्या पत्नीला हे तमिळ भाषेतील घाणेरडे शब्द शिकवले नाहीयेत.”

मात्र, यादरम्यान दोघेही हसताना दिसले. आता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने पाहिला जात आहे. (ms dhoni wife sakshi says she knows tamil bad words see how mahi responded quicky see viral)

महत्वाच्या बातम्या-
अर्जुन तेंडुलकरचं नशीब फळफळलं! IPLनंतर ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार आग ओकणारी गोलंदाजी, लगेच वाचा
विंडीजविरुद्ध फक्त 3 विकेट्स घेताच अश्विन रचणार विश्वविक्रम! कपिल पाजींनाही जमली नाही ‘अशी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---