भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस ७ जुलै रोजी असतो. दरवर्षी धोनीवर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. या वर्षी मात्र धोनी लंडनमध्ये वाढदिवस साजरा करू शकते. अलीकडेच धोनीची पत्नी साक्षी हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने धोनी आणि झिवासोबत लंडन गाठल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत धोनी आपला ४१ वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा करणार का, अशी अटकळ बांधली जात आहे. त्याचबरोबर भारतीय संघही सध्या लंडनमध्ये आहे. अशा परिस्थितीत माहीही टीमसोबत वाढदिवस साजरा करू शकतो.
भारतीय संघही लंडनमध्ये
सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. टी२० मालिकेतील पहिला सामना ७ जुलैपासून तर एकदिवसीय मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टी२० साठी (७ जुलै) अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे हे खेळाडू माहीच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकतात.
Recent Click of Thala MS Dhoni 😍 #MSDhoni pic.twitter.com/kqf7rKFyzS
— Chennai Super Kings Fans (@CskIPLTeam) July 2, 2022
साधारणपणे धोनी जर त्याच्या वाढदिवसापर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत लंडनमध्ये असेल तर तो पहिला टी२० सामना पाहायसला देखील उपस्थित राहू शकतो. अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आजवरचा धोनीच्या आयुष्याचा इतिहास पाहता धोनीला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना किंवा व्यक्त होताना पाहिलेले नाही. त्यामुळे यावर्षीही तो संघातील खेळाडूंबद्दल आपला वाढदिवस साजरा करण्यास उपलब्ध असेल यावर शंका आहे.
दरम्यान, भारतीय संघ सध्या गेल्या वर्षी कोरोनामुळे अपूर्ण राहिलेली इंग्लंडविरुद्धची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पाचव्या कोसटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसा अखेरीस ३३२ धावांनी आघाडीवर आहे. हा सामना जिंकल्यास भारत वर्ल्ड टेसेट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रविंद्र जडेजाने काढला आयपीएलमधील राग? म्हणाला, ‘जे झाले, ते…’
एजबस्टन कसोटीमध्ये विराट बनला मेंटर, कॅप्टन बुमराहला ‘अशी’ केली मदत
नशीब असावे तर असे..! बुमराहला नो बॉलमुळे मिळाल्या इंग्लंडच्या २ महत्त्वपूर्ण विकेट्स, पाहा Video