---Advertisement---

आता मेंटर म्हणून दिसणार धोनी? सीएसके नव्हेतर या संघासाठी निभावणार जबाबदारी

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 10:19 PM
MS-Dhoni-Virat-Kohli
---Advertisement---

सध्या जगभरात अनेक टी२० लीग सुरू आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला आणखी दोन नव्या लीग सुरू होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आणखी एक लीग खेळली जाईल. तर, युएईत जगातील दुसरी सर्वात श्रीमंत इंटरनॅशनल लीग टी२० खेळली जाईल. यातील दक्षिण आफ्रिकेच्या लीगमध्ये सर्व संघ हे आयपीएलच्या संघमालकांनी विकत घेतले आहेत. त्यातील जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजी ही चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीची आहे. आता या फ्रॅंचाईजीबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय.

आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये फ्रॅंचाईजी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले व जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजी मिळवण्यात ते यशस्वी ठरले.

एका प्रमुख क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजीचे नाव हे जो’बर्ग सुपर किंग्स असे असू शकते. तर या संघाचा प्रशिक्षक चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक असलेला स्टीफन फ्लेमिंग असेल. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजीचा मेंटर म्हणून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार व भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला एमएस धोनी याची वर्णी लागू शकते.

धोनी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. मात्र, वयाची चाळिशी पार केली तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना दिसतो. तसेच तो संघाचे नेतृत्व देखील करतो. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने आत्तापर्यंत चारवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. धोनीला मेंटरींगचाही काहीसा अनुभव आहे. मागील वर्षी युएई येथे झालेल्या टी२० विश्वचषकात त्याने भारतीय संघाला मेंटर केले होते. मात्र, दुर्दैवाने भारतीय संघ त्या विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”

सिकंदर रजाचे छातीठोक सेलिब्रेशन! शतकी खेळीच्या जोरावर संघाला मिळवून दिला विजय

रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---