---Advertisement---

सीएसकेसाठी सुरुवातीचे सामने महत्वाचे, धोनीच्या नावावर होणार मोठा विक्रम

On: शुक्रवार, मार्च 31, 2023 11:30 AM
MS Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 शुक्रवारी (31 मार्च) सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघ आमने सामने आहेत. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता हा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके संघ यावर्षी आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. त्याचसोबत हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्येच एमएस धोनी एक मोठा विक्रम देखील करू शकतो.

एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय संघाच्या काही महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने भारताला वनडे आणि टी-20 विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली आहे. धोनीच्या नेतृत्वा सीएसकेने आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. यावर्षी जर सीएसके (CSK) पुन्हा जिंकली, तर संघ पाच आयपीएल (IPL) ट्रॉफींसह मुंबई इंडियन्सची बरोबरी करेल. तसेच यावर्षी धोनी आपल्या 5000 आयपीएल धावाही पूर्ण करू शकतो.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या बाबतीत धोनी सध्या 9व्या क्रमांकावर आहे. येत्या काही सामन्यांमध्ये त्याने122 धावा केल्या, तर आपल्या 5000 आयपीएल धावा पूर्ण करेल. आतापर्यंत आयपीएलमध्ये अशी कामगिरी सहा खेळाडूंनी केली आहे. विराट कोहली (Virat Kohli) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर सर्वाधिक 6411 आयपीएल धावांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर 6086 धावांसह शिखर धवन आहे. तिसर्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 5764 धावांसह आहे. चौथ्या क्रमांकावर 5668 धावांसह डेविड वॉर्नर आहे. सुरेश रैना 5528 धावांसह पाचव्या क्रमांकावर. सहाव्या क्रमांकावर आहे एबी डिविलियर्स, ज्याने आरसीबीसाटी खेळताना तब्बल 5162 धावा केल्या आहेत. धोनीने या हंगामात 122 धावा केल्यानंतर तोदेखील या यादीत सामील होऊ शकतो.

आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण करणारे फलंदाज
6411 – विराट कोहली
6086 – शिखर धवन
5764 – रोहित शर्मा
5668 – डेविड वॉर्नर
5528 – सुरेश रैना
5162 – एबी डिविलियर्स
(MS Dhoni will soon complete his 5000 IPL runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पुणे, मुंबई उपनगर, अहमदनगर व रायगड संघाची विजयी सलामी.
कोण करणार सीएसकेसाठी ओपनिंग? अजिंक्य रहाणे म्हणतोय, ‘मी नेहमीच…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---