आपल्या सर्वांना माहिती आहे, की अनेक सेलिब्रिटी त्यांच्या एका चित्रपटासाठी लाखो किंवा कोटी रुपये घेतात. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार एका चित्रपटातून कितीतरी कोटी रुपये कमावतो, त्यामुळे तो भारताचा सर्वाधिक महागडा अभिनेता बनला होता. तसेच, काही बॉलिवूड अभिनेत्र्या हॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षाही अधिक रुपये घेत असल्याचेही आपण ऐकले आहे. केवळ चित्रपट सृष्टीतच नव्हे, तर क्रिकेट जगतातही किती कमाई केली जाते हे कोणापासूनही लपून नाही.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल बोलायचं झालं, तर तो क्रिकेट जगताबरोबरच बॉलिवूड इंडस्ट्रीशीही जोडला आहे. त्याच्या आयुष्यावर ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा बायोपिक (चरित्रपट) तयार झाला आहे. धोनीच्या या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मुख्य भूमिकेत होता. या बायोपिकचे धोनीने चांगलेच प्रमोशन केले होते. हा बायोपिक जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधाराच्या आयुष्यावर बनला होता. त्यामुळे साहजिकच धोनीने त्यासाठी सर्वाधिक रुपयेदेखील आकारले असतील. ती किंमत ऐकूण तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, धोनीने (MS Dhoni) आपली कहाणीसाठी निर्मात्यांना देण्यासाठी ८० कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु निर्मात्यांनी त्याची ही मागणी नाकारत २० कोटी रुपयांमध्ये करार केला होता. काही वृत्तांनुसार, निर्मात्यांनी धोनीला २० कोटी रुपये दिल्यानंतरच सिनेमाचे चित्रीकरण सुरु केले होते. परंतु धोनी सिनेमाच्या नफ्यात भाग घेणार की नाही हे स्पष्ट झाले नव्हते.
त्यावेळी माध्यमांत धोनीने ६० कोटी, ४० कोटी व २० कोटी यापैकी रक्कम घेतल्याची वृत्त होती. परंतु दिग्दर्शक निरज पंड्या यांनी धोनीने ६० किंवा ४० कोटीसारखी मोठी रक्कम घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.
जेव्हा सिनेमा तयार होत होता, तेव्हा असे म्हटले जात होते की धोनीने करार होईपर्यंत सिनेमा तयार करण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे सिनेमाचे प्रदर्शित होण्यास उशीर झाला होता. रुपयांच्या बाबतीत वारंवार बैठका होत होत्या.
या बायोपिकमध्ये धोनीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांतने १४ जून २०२० रोजी आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो ३४ वर्षांचा होता. सध्या मुंबई पोलिस घटनेची तपासणी करत आहेत.