---Advertisement---

तब्बल ३५० वनडे सामने खेळणाऱ्या धोनीबद्दल ‘या’ गोष्टी क्रिकेटप्रेमीला माहित हव्याच!

On: बुधवार, जुलै 7, 2021 10:30 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याने आजपर्यंत अनेक विक्रम केले आहेत. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ३५० वनडे, ९० कसोटी आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात मिळून त्याने १७ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

तो ३५० किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळणारा भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी केवळ सचिन तेंडुलकरने हा टप्पा पार केला आहे. सचिनने ४६३ वनडे सामने खेळले आहेत. या व्यतिरिक्तही धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

अशा या दिग्गजाबद्दल एक जाणकार क्रिकेटप्रेमी म्हणून आपणाला हे नक्की माहित पाहिजे!

#१ ३५० वनडे सामन्यांपैकी धोनी भारताकडून ३४७ तर ३ सामने आशिया संघाकडून खेळला आहे. त्यात त्याने एकूण ५०.५७च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत.

#२ ३१ ऑक्टोबर २००५ला जयपूरला धोनीने वैयक्तिक सर्वोच्च धावा करताना लंकेविरुद्ध नाबाद १८३* धावा केल्या होत्या.

#३ धोनीने चितगावला २३ डिसेंबर २००४ साली बांगलादेश संघाविरुद्ध वनडे पदार्पण केले आणि त्या सामन्यात तो गोल्डन डक अर्थात पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता.

#४ भारताकडून सार्वधिक वनडे धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन(१८४२६), विराट(११८६७) गांगुली(११२२१), द्रविड(१०७६८) यांच्यापाठोपाठ धोनी(१०५९९) पाचव्या स्थानी आहे.

#५ धोनीने धावांचा पाठलाग करताना जिंकलेल्या वनडे सामन्यात तब्बल ४७ नाबाद खेळी खेळल्या आहेत.

#६ धोनी वनडेमध्ये तब्बल ८४वेळा नाबाद राहिला आहे.

#७ वनडेमध्ये सार्वधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी शाहिद आफ्रिदी(३५१), ख्रिस गेल(३३१) सनथ जयसूर्या(२७०), रोहित शर्मा (२४४) यांच्यापाठोपाठ २२९ षटकारासह चौथ्या स्थानी आहे.

#८ वनडेत १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना धोनीची सरासरी सार्वधिक अर्थात १०२.७१ आहे. अन्य कोणत्याही खेळाडूची ही १००च्या पुढे नाही.

#९ ६व्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने वनडेत विक्रमी ४१६४ धावा केल्या आहेत.

#१० वनडेत सर्वाधिक वेळा यष्टिचित करण्याचा विक्रम सध्या धोनीच्या नावावर असून त्याने १२३ वेळा खेळाडूला यष्टिचित केले आहे.

#११ २५० किंवा त्यापेक्षा जास्त वनडे खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये धोनीची सरासरी सार्वधिक आहे. त्याची ३५० सामन्यात सरासरी ५०.५७ आहे तर या यादीत दुसऱ्या स्थानावर सचिन असून त्याची सरासरी ४४.८३ आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment