भारतीय संघाने मायदेशात खेळलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दणक्यात विज मिळवला. पाहुण्या इंग्लंड संघाला भारतीय संघाने या वनडे मालिकेत क्लीन स्वीप दिला. भारतीय संघाला आता मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 जानेवारी) रांचीमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ रांचीत दाखल झाला असून ड्रेसिंग रूममध्ये एका खास आणि संघासाठी महत्वाच्या व्यक्तीने भेट दिली.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचे रांची हे मुळ गाव. निवृत्तीनंतर धोनी त्याचा बहुतांश वेळ रांचीमध्येच घालवतो. अशात भारतीय संघ रांचीमध्ये आल्यानंतर धोनीने देखील आपुलकीने संघाची भेट घेतली. संघातील त्याच्या जुन्या खेळाडूंना भेटण्यासाठी धोनी थेट ड्रेसिंग रुममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. चाहत्यांच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/reel/Cn4Kqyjjkr-/?utm_source=ig_web_copy_link
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ ) यांच्यातील वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ त्यार आहेत. मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारी, दुसरा सामना 29 जानेवारी, तर तिसरा टी-20 सामना 1 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी एमएस धोनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर खेळाडूंचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ धोनीला फेटल्यानंतर आनंदी दिसत आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या वनडे मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहील (Virat Kohli) या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे.
टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघ –
भारत – हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड़ (दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
न्यूझीलंड – मिशेल सैंटनर (कर्णधार), फिन एलेन, माइकल ब्रेसवेल, डेन क्लीवर, डेवॉन कॉनवे, शेन डफी, लॉकी फर्ग्यूसन, बेन लिस्टर, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, माइकल रिपन, हेनरी शिपली, ईश सोढी, ब्लेयर टिकनर. (MS Dhoni’s sudden entry into the Indian team’s dressing room)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुल-अथियाला भेटवस्तू देण्यासाठी विराटने खर्च केले दोन कोटी, धोनीनेही मोठ्या मनाने दिले 80 लाखांचे खास गिफ्ट
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाजची दुखापतीमुळे माघार