मुंबई उपनगर जिल्हा व ठाणे जिल्ह्याच्या टेबल टेनिस खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य व आंतरजिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुल येथील स्पर्धेत ठाण्याच्या सिद्धेश पांडेने पुरुष एकेरीत मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ऋषिकेश मल्होत्रावर सरळ गेममध्ये विजय मिळवला. तिस-या मानांकित सिद्धेशने ऋषिकेशवर 4-0 (11-8, 11-4, 11-5, 11-9) असा विजय नोंदवला.
दिया चितळे ( मुंबई उपनगर जिल्हा) हिने महिला एकेरीच्या अव्वल मानांकित श्रुष्टी हालेंगडीवर 4-1 (11-7, 11-5, 9-11, 12-10, 11-9) असा विजय मिळवला. मुलींच्या ज्युनियर गटात देखील दियाने तिस-या मानांकित पुण्याच्या पृथा वर्तीकरचा 4-0 (11-8, 17-15, 11-8, 11-8) असा पराभव केला.
मुलांच्या ज्युनियर गटात चौथ्या मानांकित ठाण्याच्या दिपीत पाटीलने एअर इंडियाच्या शौनक शिंदेला 4-1 (10-12, 11-3, 11-7, 11-4, 11-7) असे नमविले. मुलींच्या सब ज्युनियर गटातील सामन्यात अव्वल मानांकित राजवीर शाहने मुंबई उपनगरच्या आदील आनंदला 4-1 (11-5,11-6,14-16, 11-8, 11-1) असे पराभूत केले.
मुंबई उपनगरच्या चिन्मय सोमय्या व अनन्या बासक यांनी अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या युथ गटात सुवर्णकामगिरी केली. चिन्मयने दुस-या मानांकित शुभम आंब्रेवर 4-3 (11-9,5-11,9-11, 7-11, 11-4, 11-6, 11-6) असा विजय मिळवला तर, अनन्याने श्रुष्टी हालेंगडीवर 4-2 (10-12,12-10, 11-8, 12-10, 9-11, 11-6) असा विजय नोंदवला.
दरम्यान, मुलांच्या कॅडेट गटात ठाण्याच्या हृदय देशपांडेने पुण्याच्या प्रणव घोलकरला 4-1 (11-6, 9-11,11-4,11-3,11-5) असे पराभूत केले.तर, मुलींच्या मिडेट गटात अव्वल मानांकित ठाण्याच्या रिआना भूताने पुण्याच्या नैशा रेवसकरला 3-0 (11-4, 11-8, 11-8) असे नमविले.