---Advertisement---

“त्यावेळी शास्त्री आणि कोहलीचा चेहरा देखील पाहत नसे”, माजी निवडकर्त्यांचा खुलासा

On: मंगळवार, जून 8, 2021 8:16 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट निवड समिती, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील वाद, आपल्यासाठी काही नवीन नाही. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून होणारे वाद हे सगळ्यांसमोर स्पष्टपणे येतच असतात. कोणत्या खेळाडूला संधी दिली पाहिजे, कोणत्या खेळाडूला नाही दिली पाहिजे या गोष्टीवरून निवड समिती आणि कर्णधार व प्रशिक्षक यांच्यात नेहमीच मतभेद होतच असतात. कर्णधाराला असा खेळाडू हवा असतो जो आपल्या संघासाठी नेहमी उभा राहील. परंतु, कधी कधी निवड समिती त्याचा विरोध करते. त्यामुळे कर्णधार आणि निवड समितीत वाद होतच असतात. असाच एक यापूर्वी माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि प्रशिक्षक रवी शास्त्री व विराट कोहली यांच्यात झालेला वाद समोर आला आहे.

एमएसके प्रसाद यांनी काही काळ भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९चा विश्वचषक खेळला. आता एमएसके प्रसाद आपल्या पदावरून काढले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या गोष्टींना आता उजाळा देत आहेत.

एमएसके प्रसाद सांगतात की, “खूप वेळा संघ निवडताना भारतीय कर्णधार विराट कोहली  आणि प्रशिक्षक रवी शास्त्री सोबत भांडणे होत असे. आमची खूप वेळा मिटिंगमध्ये बाचाबाची होत असे आणि मिटिंग तशीच संपत असे. परंतु, दुसऱ्या दिवशी सगळं नीट होत असे.”

एका संकेतस्थळाशी बोलताना प्रसाद म्हणाले, “तुम्ही त्यांना जाऊन एकदा विचारा की, कशा प्रकारे मिटिंगमध्ये आम्ही वागत होतो. कधी कधी मिटिंगनंतर आम्ही एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहत नव्हतो. परंतु, चांगली गोष्ट ही होती की, दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नीट झालेलं असे आणि आम्ही एकमेकांचा सन्मान करत गोष्टी पुढे नेत असे. मी एक मॅनेजमेंटचा विद्यार्थी असून मला माहिती आहेत लोकांना कसे मॅनेज करायचे.”

एमएसके प्रसाद २०१६ पासून भारतीय निवड समितेचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. २०२०ला त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि त्यांची जागा सुनील जोशी यांनी घेतली. आणि आता चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीचा मुख्य धुरा आहे.

महत्वाच्या बातम्या:

विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक

इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी

चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---