इंग्लिश क्रिकेटपटूंच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सनला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) निलंबित केले. सुमारे आठ वर्षांपूर्वी रॉबिन्सनने सोशल मीडियावर लैंगिकता आणि वर्णद्वेषाबद्दल टिप्पण्या केलेल्या, ज्या त्याच्या पदार्पणानंतर व्हायरल झाल्या आणि मंडळाने त्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले.
याचबरोबर, आता आणखी एक इंग्लिश खेळाडू वांशिक टिप्पणीमुळे मंडळाच्या नजरेत आला आहे. या खेळाडूने किशोरावस्थेत अशा प्रकारचे ट्विट केले होते ज्याची आता चौकशी केली जाईल.
आणखी एका खेळाडूबाबत झाला खुलासा
ओली रॉबिन्सनप्रमाणे आणखी एका इंग्लिश क्रिकेटपटूने किशोरावस्थेत असताना काही आपत्तीजनक सोशल मीडिया टिप्पणी केल्या होत्या. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने नाव न उघड करता या खेळाडूच्या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. हे ट्विट केले तेव्हा सदर खेळाडू १६ वर्षाचा देखील नव्हता. आता ईसीबीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले असून, चौकशीला सुरुवात केली आहे. या वृत्ताला ईसीबीने देखील दुजोरा दिला असून, आरोप सिद्ध झाल्यास त्या खेळाडूवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
ओली रॉबिन्सनला केले गेले निलंबित
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. तसेच रॉबिन्सनसाठी हा आपल्या कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना ठरला आहे. रॉबिन्सनने या सामन्यात ७ गडी बाद केले होते. यासोबतच ४२ धावांची आक्रमक खेळी देखील केली होती. सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर त्याने २०१२ मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटसाठी माफी देखील मागितली होती. तरीही त्याला ईसीबीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निलंबित केले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या:
चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ: पाकिस्तानच्या हसन अलीसह या खेळाडूंना मिळाले नामांकन
धोनीच्या फार्महाउसची करा घरबसल्या सैर, पत्नी साक्षीने शेअर केले फोटो






