मुंबई: पाचव्या एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत राज्यातील अव्वल 8 क्लबमधील 70 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा एसएसके क्लब, नाशिक येथे 17 ते 19 जुन या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेतील आठ संघांमध्ये मुंबईतील खार जिमखाना, सीसीआय अ, मुंबई सबर्बन टेनिस संघटना, पुण्यातील पीवायसी अ, ब व क संघ, नाशिक जिल्हा संघ आणि कम्बाईन जिल्हा संघांचा समावेश आहे. हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असून याआधीच्या सहा महिन्यापूर्वी राज्यभरात विविध ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत 1200हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. तसेच, मागील महिन्यात पुण्यात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरक्लब स्पर्धेत दोन संघांची निवड करण्यात आली.
स्पर्धेत एकूण 7,50,000रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून सर्व संघांना हॉस्पिटॅलिटी व प्रवासाचा खर्च देखील देण्यात येणार आहे. 35वर्षावरील गटात अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. वर्षानुवर्षे याची लोकप्रियता पाहून आम्हांला आनंद होत आहे, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. यावर्षी राज्यातील 8 विभागातील प्रत्येक जिल्हयांतून खेळाडू सहभागी झाले होते. याआधीची मालिका पुण्यात दोन वेळा, मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी पार पडली असून कोविडमुळे या स्पर्धेचे आयोजन करता आले नाही. पुन्हा या स्पर्धेचे आयोजन करून आम्हांला आनंद झाला असल्याचे एमएसएलटीएचे सहसचिव आणि स्पर्धा संचालक राजीव देशपांडे यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार आणि शितल भोसले यांचा समावेश असून नाशिकचे राकेश पाटील स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील सहभागी संघ व गट पुढीलप्रमाणे:
अ गट: पीवायसी अ, कम्बाईन डिस्ट्रिक, मुंबई सबर्बन टेनिस संघटना, पीवायसी क;
ब गट: खार जिमखाना, सीसीआय अ, नाशिक जिल्हा संघ व पीवायसी ब
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू दमदार शकतो पुनरागमन
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण